Panvel: सख्ख्या भावाचा चेहराही ओळखता येईना, भावाने जे केलं ते पाहून पोलीसही स्तब्ध, पनवेलमधील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर ७ परिसरात ही घटना घडली. दत्तु वाल्या काळे असं मृत भावाचं नाव आहे.
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
पनवेल: नवी मुंबईतील पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सख्ख्या भावाने आपल्या भावाची दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी भाऊ एका तासात अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर ७ परिसरात ही घटना घडली. दत्तु वाल्या काळे असं मृत भावाचं नाव आहे. तर नागेश वाल्या काळे असं आरोपी भावाचं नाव आहे. नागेशने आपला भाऊ दत्तू काळे यांची 25 सप्टेंबरच्या रात्री दगडाने ठेचून हत्या केली होती. भावाच्या हत्येनंतर नागेश पळून गेला होता. पण घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतलं होतं.
advertisement
नेमकं काय घडलं?
२५ सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. मृत दत्तू काळे यांचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या मुद्यावर आरोपी नागेश काळे आणि दत्तू काळे यांच्यामध्ये कडाक्याचं भांडणं झालं. या भांडणातून नागेश काळे याने भाऊ दत्तू काळे याच्यावर हल्ला केला आणि दगडाने चेहरा ठेचून काढला. जबरी मार लागल्यामुळे जागेवर दत्तू काळे याचा मृत्यू झाला होता.
advertisement
त्यानंतर रात्री ८.३७ वाजता डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीनुसार, बिट मार्शल ०५ चे पोलीस अंमलदार पोहवा विलास कारंडे आणि पोहवा राजेंद्र केणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ तपासादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत दत्तू वाल्या काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
या प्रकरणी मृत दत्तू काळे यांचा मुलगा दिपक काळे याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५७०/२०२५ भा.दं.वि. कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नागेश काळे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Panvel,Raigad,Maharashtra
First Published :
September 26, 2025 7:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panvel: सख्ख्या भावाचा चेहराही ओळखता येईना, भावाने जे केलं ते पाहून पोलीसही स्तब्ध, पनवेलमधील घटना