advertisement

दुष्काळाच्या सावटातील शेतकऱ्यांना फटका, 'या' फळाच्या उत्पन्नात होणार घट!

Last Updated:

मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद होत असतानाच शेतकऱ्यांपुढं नवं संकट ठाण मांडून बसलंय.

+
दुष्काळाच्या

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांना फटका, 'या' फळाच्या उत्पन्नात होणार घट!

बीड, 5 सप्टेंबर : मराठवाड्यातील शेतकरी आधीच पाण्याअभावी संकटात सापडला असताना आता सीताफळ उत्पादकांसमोर नव संकट उभं राहिलंय.‌ यंदा उन्हाळ्यात झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे सीताफळाला बहर येऊन गेला. त्यामुळे मृग बहरातील फळधारणा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. नेहमीच्या तुलनेत साधारणता 50 ते 60 टक्के फळे कमी येण्याचा शक्यता आहे, असं बीडमधील कृषी अभ्यासक के. जी. शाहीर यांनी सांगितलं.
बीडमध्ये सीताफळ लागवडीचं क्षेत्र अधिक
राज्यातील सोलापूर, हिंगोली, परभणी आणि त्यानंतर सर्वाधिक सीताफळ लागवडीचे क्षेत्र हे बीड जिल्ह्यातील धारूर आणि वडवणी तालुक्यात आहे. या गावातीलच सीताफळाला दरवर्षी दिवाळीत पर राज्यातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्यामुळे सीताफळ उत्पादकांना वर्षातून एकदाच थोडा का होईना फायदा होतो. मात्र यंदा ऐन उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं सीताफळाचं पीक आता धोक्यात आलंय.
advertisement
सीताफळाचं पीक धोक्यात
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सीताफळाच्या फळधारणेमध्ये कमतरता दिसून येतेय. या मागची प्रमुख कारणे म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. याचा परिणाम थेट सीताफळाच्या झाडामधील जो अन्नसाठा तयार झालेला होता, तो पूर्णपणे झाडाच्या माध्यमातून बाहेर फेकला गेला. याचा अर्थ फळबागा लिकेज झाल्या, असे कृषी अभ्यासक शाहीर सांगतात.
advertisement
नेमकं झालंय काय?
राज्यात काही अपवाद परिसर सोडला तर सर्वच ठिकाणी सीताफळाचा मृग बहर धरतात. मृग बहरातील सीताफळे ऑक्टोबर मध्ये तोडणी सुरू होते. डिसेंबर जानेवारीपर्यंत तोडणी झाल्यानंतर बागेचे पाणी सोडून खत घालून छाटणी केली जाते. त्यानंतर थेट मे किंवा जून महिन्यात पाणी सोडले जाते. यंदा मात्र मार्च महिन्यात जोरदार व सतत पाऊस पडल्याने झाडाला पाणी मिळाले. त्यामुळे तेव्हाच भर आला आणि त्याच झाडांची ताकद वाया गेल्याने जूनमध्ये धरलेला मृग बहर फळे कमी लागत आहेत, असे शाहीर यांनी सांगितलं.
advertisement
फळधारणा 50 टक्केपर्यंत कमी
ज्या ठिकाणी सिताफळाला योग्य वेळी छाटणी आणि पाण्याचा नियोजन झाले आहे. त्या बागेमध्ये फळधारणा चांगली दिसून येते. मात्र बीड जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील सीताफळांच्या बागांत जवळपास 50 ते 60 टक्के पर्यंत फळधारणा कमी झाल्याचे दिसून येते. त्याचा मोठा फटका आता सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
दुष्काळाच्या सावटातील शेतकऱ्यांना फटका, 'या' फळाच्या उत्पन्नात होणार घट!
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement