25 पंढरपुरी म्हशी अन् घरीच डेअरीची सुरुवात, सोलापुरातील दूध विक्रेता महिन्याला करतोय 2 लाखांची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सोलापूर शहरात राहणाऱ्या आनंद लामखाने यांनी योग्य नियोजन करून घरीच डेअरी सुरू केली आहे. या डेअरी मार्फेत ते महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : योग्य नियोजन आणि कामाची आवड असल्यास कोणताही व्यवसाय आपल्याला यशस्वी करता येऊ शकतो. हेच सोलापुरातील आनंद लामखाने यांनी दाखवून दिले आहे. सोलापूर शहरात राहणाऱ्या आनंद लामखाने यांनी योग्य नियोजन करून घरीच डेअरी सुरू केली आहे. या डेअरी मार्फेत ते महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत.
दररोज करतात 150 ते 180 लीटर दुधाची विक्री
सोलापुरातील स्वामी समर्थनगर मजरेवाडी आनंद लामखाने राहायला आहेत. त्यांच्या डेअरीत तब्बल 25 म्हशी आहेत. लामखाने हे दररोज सुमारे 150 ते 180 लीटर दुधाची विक्री करतात. रोज सकाळी स्वत: म्हशीचे दूध काढून स्वतःच्या डेअरीत विकतात. उत्तम कॉलिटीचे दुध 70 रुपये लिटरने विक्री करतात तर शुद्ध कॉलिटीचे दुध हे 100 रुपये लिटरने विक्री करतात.
advertisement
फक्त 15 रुपयांत होतेय गरिबांची न्याहरी, सोलापूरच्या फेमस दाल चावलची टेस्टच लय भारी
आनंद लामखाने यांच्याजवळ पंढरपुरी म्हशी आहेत. या जातीच्या म्हशी दुग्ध व्यसायासाठी उत्तम समजल्या जातात. या पंढरपुरी म्हशी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या जातीच्या म्हशी मध्यम आकाराच्या असून यांचा चेहरा लांब आणि निमुळता असतो. विशेष म्हणजे या म्हशीची शिंगे 45 ते 50 सेंटीमीटर पर्यंत वाढलेली आणि अगदी खांद्यापर्यंत आलेली असतात.
advertisement
महिन्याला लाखोंची कमाई
view commentsदुग्ध व्यवसायसाठी उपयुक्त असणारी ही पंढरपुरी म्हैस हलक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर सुद्धा तग धरून राहू शकते. जवळजवळ सर्व प्रकच्या वातावरणात ही जात चांगले दूध देते. सर्व म्हशींना वेळेवर चारा पाणी आणि त्यांची देखभाल करणे हे सर्व काम आनंद लामखाने करत असतात. दुध विक्रीचा व्यवसाय जपणारी लामखाने यांची ही तिसरी पिढी आहे. एकेकडी दुधाला भाव नसल्याने शेतकरी हावलदिल होत आहे. मात्र शहरातील नागरिकांना 100 रुपये लिटरने म्हशीचं कोरे दुध विकून आज आनंद लामखाने महिन्याआखेर 2 ते अडीच लाख रुपयांची कमाई करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jun 15, 2024 12:52 PM IST
मराठी बातम्या/मनी/कृषी/
25 पंढरपुरी म्हशी अन् घरीच डेअरीची सुरुवात, सोलापुरातील दूध विक्रेता महिन्याला करतोय 2 लाखांची कमाई








