केमिकल युक्त अगरबत्तीने दुखायचं मुलांचे डोकं, महिलेने सुरू केला गाईच्या शेणापासून अनोखा व्यवसाय, आता लाखोंची कमाई

Last Updated:

विविध फुलांच्या सुगंधी अगरबत्ती बनवण्याचे काम ज्योती सस्कर या करत आहेत. त्यांनी संगमनेर तालुक्यामध्ये स्वतःचा प्लांट उभारला असून या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई त्या करत आहेत.

+
ज्योती

ज्योती सस्कर

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : क्षेत्र कोणतेही असो, महिलांच्या प्रयत्नांना पाठबळ दिलं तर त्या कोणत्याही क्षेत्रात गगनभरारी घेऊ शकतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ज्योती सस्कर यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. जालना शहरात सुरू असलेल्या गोदा समृद्धी कृषी प्रदर्शनात त्यांनी आपला स्टॉल लावला असून गाईच्या शेणापासून धूप आणि अगरबत्ती त्या बनवतात. त्याचबरोबर विविध फुलांच्या सुगंधी अगरबत्ती बनवण्याचे काम ज्योती सस्कर या करत आहेत. त्यांनी संगमनेर तालुक्यामध्ये स्वतःचा प्लांट उभारला असून या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई त्या करत आहेत. तसेच काही जणींना रोजगार देण्याचे काम देखील ज्योती सस्कर करत आहेत. 
advertisement
ज्योती सस्कर या सर्वसामान्य गृहिणी होत्या. त्यांच्या एका मैत्रिणीने शहरात लागलेल्या एक्झिबिशनमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे हट्ट धरला. एक्झिबिशनमध्ये त्यांनी वेगवेगळे स्टॉल पाहिले. त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वस्तू पाहून आपणही स्वतःचे काहीतरी सुरू करावं असं त्यांना वाटू लागलं. मग त्यांनी कुरडया पापड्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू वेगवेगळे व्यवसाय करत वाढवत नेले.
advertisement
अगरबत्ती प्रेमी असल्याने त्यांना या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा होती. केमिकल युक्त अगरबत्तीने त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांचे ही डोकं दुखायचं. त्यामुळे त्यांनी शुद्ध गाईच्या गोमूत्रापासून धूप आणि अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय संगमनेरमध्ये सुरू केला. त्याचबरोबर विविध फुलांच्या सुगंधी अगरबत्ती आणि धूप बनवणे सुरू केलं. त्यांच्या या व्यवसायात त्यांच्या कुटुंबीयांचेही पाठबळ मिळालं. जालना शहरात सुरू असलेल्या गोदा समृद्धी कृषी प्रदर्शनात त्यांचा स्टॉल हे सगळ्यांचं आकर्षण ठरत असून गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या धूप आणि अगरबत्तीला सर्वाधिक मागणी असल्याचे ज्योती सस्कर यांनी सांगितलं.
advertisement
अगरबत्ती आणि धूप बनवण्याच्या या व्यवसायाच्या माध्यमातून ज्योतीताई स्वतः सक्षम तर झाल्याच त्याच बरोबर त्यांनी परिसरातील चार ते पाच पहिल्यांदा रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात त्यांना योग्य संधी आणि पाठबळ मिळालं तर त्या यशस्वी होऊ शकतात हेचं ज्योती सस्कर यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
केमिकल युक्त अगरबत्तीने दुखायचं मुलांचे डोकं, महिलेने सुरू केला गाईच्या शेणापासून अनोखा व्यवसाय, आता लाखोंची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement