फक्त 9% व्याजावर येथे मिळतंय पर्सनल लोन! जाणून घ्या 9 लाखांच्या लोनवर किती येईल EMI?

Last Updated:

तुमचे किमान वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असेल, तर तुम्ही या पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. या कर्जासाठी कोणत्याही हमीदाराची आवश्यकता नाही.

पर्सनल लोन
पर्सनल लोन
मुंबई : आयुष्यात अनेक वेळा अतिरिक्त पैशांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, पर्सनल लोन कर्ज हा एक चांगला पर्याय आहे. पर्सनल लोन म्हणजे असे कर्ज आहे ज्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारणाची किंवा सुरक्षेची आवश्यकता नसते आणि ते खूप कमी कागदपत्रांसह दिले जाते. तुम्ही या कर्जातून मिळालेली रक्कम कोणत्याही कायदेशीर आर्थिक गरजेसाठी वापरू शकता. इतर कोणत्याही कर्जाप्रमाणे, तुम्हाला बँकेशी मान्य केलेल्या अटींनुसार ते परत करावे लागेल. सहसा पर्सनल लोनवरील व्याजदर खूपच महाग असतो, परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र दरवर्षी फक्त 9 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देत आहे.
हे पर्सनल लोन कोण घेऊ शकते
बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुमचे किमान वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असेल, तर तुम्ही या पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. कोणताही ग्राहक त्याच्या एकूण मासिक उत्पन्नाच्या 20 पट पर्यंत पर्सनल लोन घेऊ शकतो. हे जास्तीत जास्त 20 लाख रुपये असू शकते. बँकेचे म्हणणे आहे की या कर्जासाठी हमीदाराची आवश्यकता नाही. कमीत कमी कागदपत्रांसह या पर्सनल लोनसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला कर्जाच्या रकमेच्या 1% + GST प्रोसेसिंग फीस म्हणून भरावे लागेल.
advertisement
कोणतेही हिडेन चार्ज नाही
बँकेनुसार, महा बँक पर्सनल लोन योजनेअंतर्गत घेतलेल्या या पर्सनल लोनवर कोणत्याही प्रकारचा हिडन चार्ज नाही. तुम्ही तुमच्या कर्जाला ट्रॅक देखील करु शकता. तसेच, प्रीपेमेंटवर कोणतेही शुल्क नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की 9 टक्के व्याजदराने हे पर्सनल लोन फक्त उत्कृष्ट क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांनाच उपलब्ध असेल. बँकेनुसार, जर तुमचा CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर 800 किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्हाला सर्वात स्वस्त दराने वैयक्तिक कर्ज सहज मिळू शकते.
advertisement
EMI गणना समजून घ्या
तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रकडून 9 टक्के व्याजदराने 5 वर्षांसाठी 9 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले, तर कॅलक्युलेशननुसार, तुमचा मासिक EMI 18,683 रुपये असेल. कॅलक्युलेशननुसार, तुम्ही या कर्जावर फक्त व्याज म्हणून ₹ 2,20,951 भराल. म्हणजे शेवटी तुम्हाला एकूण ₹11,20,951 बँकेला परत करावे लागतील. कर्जाच्या बाबतीत, एक गोष्ट समजून घ्या की परतफेडीचा कालावधी जितका कमी असेल तितका कमी व्याज तुम्ही द्याल. हो, तुमचा प्रीमियम थोडा जास्त असू शकतो.
मराठी बातम्या/मनी/
फक्त 9% व्याजावर येथे मिळतंय पर्सनल लोन! जाणून घ्या 9 लाखांच्या लोनवर किती येईल EMI?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement