Budget आधी मोठी बातमी! आठवड्यातले 5 दिवस बँका सुरू राहणार? वेळ आणि नियम बदलणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आता या संपूर्ण प्रकरणाला आरबीआय आणि सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यानंतरच देशातील सर्व बँकांमध्ये 5 दिवस काम 2 दिवस सुट्टी हा नियम लागू होईल.
मुंबई: तुम्ही बँकेत कामासाठी जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, आधीच फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसांपैकी शनिवार रविवार पकडून 13 दिवस बँक बंद राहणार आहे. ह्या सुट्ट्या प्रत्येक राज्यांनुसार वेगवेगळ्या आहेत.आता बजेटमध्ये बँकेच्या कामाच्या तासांबद्दल महत्त्वाची घोषणा होऊ शकते. बँक कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुट्टी द्यावी आणि 5 दिवसांचा आठवडा करावा ही मागणी कर्मचारी मागच्या काही वर्षांपासून करत होते. आता यावर बजेटमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
5 दिवसांचा आठवडा
सध्या बँक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहते. बँक कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बँका आठवड्यातून फक्त पाच दिवस सुरू राहतील. देशातील करोडो बँक ग्राहकांसाठी बँक शाखा उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ बदलणार आहे, कामाचे तास वाढतील आणि पाच दिवसांचा आठवडा केला जाऊ शकतो. अर्थसंकल्पातील या महत्त्वाच्या निर्णयाला सरकार मान्यता देते की नाही, हे 1 फेब्रुवारीला कळणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
advertisement
पहिला आणि तिसरा शनिवारही सुट्टी द्या, संघटनांकडून मागणी
बँक कर्मचारी आणि संघटना अनेक दिवसांपासून सरकारकडे पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करत आहेत. जर या निर्णयाला मंजुरी मिळाली तर बँक कर्मचाऱ्यांना दररोज शाखेत 40 मिनिटे जादा काम करावं लागेल. त्यानंतर दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी बँकांच्या शाखा बंद राहतील. आतापर्यंत बँकांमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम होते. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहात होत्या.
advertisement
बँक कर्मचाऱ्यांना महिन्याभरात 6 ऐवजी 8 सुट्ट्या मिळणार आहेत.
बँक कर्मचारी एका महिन्यात 6 सुट्ट्यांऐवजी 8 सुट्ट्यांची मागणी करत आहेत. यासाठी बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात करार झाला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण सरकार आणि आरबीआयच्या मंजुरीची वाट पाहात आहेत. बँक कर्मचारी संघटना, आरबीआय आणि सरकारी अधिकारी यांच्यात बँकांमध्ये 15 दिवस काम करण्याबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाला आरबीआय आणि सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यानंतरच देशातील सर्व बँकांमध्ये 5 दिवस काम 2 दिवस सुट्टी हा नियम लागू होईल.
advertisement
ग्राहकांना या अडचणींना समोरं जावं लागेल
बँकिंग कामकाजाच्या तासात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना सेवा मिळण्यात अडचण येणार नाही, असा दावा युनियनकडून करण्यात आला आहे. 5 दिवस बँकांमध्ये काम केल्यामुळे लोकांना त्यांचे काम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. विशेषत: जे काम करत आहेत, जे शनिवारी आपले काम पूर्ण करतात. त्यांना काम पूर्ण करण्यासाठी शनिवार मिळणार नाही. केवळ 5 दिवसांच्या आत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.
advertisement
बँक शाखा उघडण्याची आणि बंद करण्याची ही नवीन वेळ असेल?
नवीन नियमांनुसार, बँकिंग तासांमध्ये 40-45 मिनिटे वाढ होऊ शकते.
सध्याचे वेळापत्रक: बहुतांश बँका सकाळी 10:00 ते संध्याकाळी 4:00 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुल्या असतात.
नवीन वेळापत्रक (प्रस्तावित):
सकाळी 9:45 वाजता बँक सुरू होईल. (15 मिनिटे लवकर)
advertisement
संध्याकाळी 5:30 वाजता बँक बंद होईल. (30 मिनिटे उशिरा)
सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास बँका 40 मिनिटे अतिरिक्त उघडतील. बँकेच्या शाखा सकाळी ९.४५ वाजल्यापासून सुरू होतील. जे सकाळी 10 वाजता सार्वजनिक व्यवहारासाठी खुले होते. म्हणजेच बँकेची शाखा नियमित वेळेच्या १५ मिनिटे आधी लोकांसाठी उघडेल. सायंकाळी साडेपाचपर्यंत बँकेची शाखा बंद राहणार आहे. जे सध्या 5 वाजेपर्यंत बंद होते. सध्या बहुतांश बँका सार्वजनिक व्यवहारासाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उघडल्या जातात. युनियन्सचे म्हणणे आहे की 5 दिवस कामकाजाच्या अंमलबजावणीचा ग्राहक सेवेवर परिणाम होणार नाही. बँक कर्मचाऱ्यांचे कामाचे तास दररोज सुमारे 40 ते 45 मिनिटांनी वाढवता येतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 31, 2025 2:18 PM IST


