वडील DGP, UPSC परीक्षा न देताच IPS, घरात सोन्याचं घबाड अन् 7 कोटींच्या नोटा सापडलेले DIG कोण?

Last Updated:

DIG हरचरण सिंह भुल्लर यांना CBI ने ८ लाखांची लाच घेताना अटक केली, त्यांच्या घरी ७ कोटी रोकड, १.५ किलो सोनं, लक्झरी गाड्या आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त.

News18
News18
नोटा मोजून मशीन गरम झालं, डोळे विस्फारले तरी संपेना इतकं मोठं घबाड, DIG च्या घरी सापडलं, सर्वात मोठी रेड चालली इतकी मोठी की अधिकारी आणि कर्मचारी अक्षरश: रक्कम मोजून आणि कागदपत्रांची टॅली करता करता थकले. असे DIG ज्यांनी UPSC न देताच थेट SPS सर्व्हिसला लागले. त्यानंतर DIG पदापर्यंत पोहोचले. हरचरण सिंह भुल्लर यांची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. संपूर्ण व्यवस्थेला पैसे पुरवून त्यांनी आपलं पद राखून ठेवलं, मात्र एका मोहामुळेच लाच घेत असताना त्यांची खुर्ची डळमळीत झाली आणि सगळी कुंडलीच बाहेर आली.
पंजाब पोलीस दलातील डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांना नुकताच CBI ने ८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या घटनेने केवळ पोलीस दलालाच नव्हे. भुल्लर यांच्या अटकेनंतर त्यांच्या निवासस्थानातून ७ कोटींची रोकड आणि १.५ किलो सोनं जप्त करण्यात आले. चांगल्या कामासोबतही त्यांनी घेतलेली लाच आणि भ्रष्टाचार करुन मिळवलेली रक्कम यामुळे त्यांच्या नावावर मोठा ठपका लागला आहे.
advertisement
भुल्लर यांचे वडील पंजाबमध्ये DGP 
हरचरण सिंह यांचे वडील, मेजर मेहल सिंह भुल्लर हे एक मोठं नाव. मेहल सिंह यांनी १९६० च्या दशकात भारतीय सैन्यात प्रवेश केला. त्यांनी १९६२ चे चीन युद्ध, १९६५ चे पाकिस्तानविरुद्धचे युद्ध आणि मिझोराममधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये शौर्य गाजवलं. सैन्यातून बाहेर पडल्यानंतर ते आयपीएस अधिकारी बनले आणि १९८०-९० च्या दशकात त्यांनी पंजाबमधील दहशतवादाविरुद्धच्या ऐतिहासिक लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २००२-२००३ मध्ये ते पंजाबचे पोलीस महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला.
advertisement
त्यांनी PAP कॉम्प्लेक्स आणि पोलिस DAV स्कूलची स्थापना केली. विशेष म्हणजे, त्यांनी प्रसिद्ध डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) पैलवान 'द ग्रेट खली' यांनाही प्रशिक्षण दिले होते. वडिलांची ही प्रेरणादायी कारकीर्द हरचरण यांच्यासाठी मोठा प्रेरणास्रोत होती. त्यामुळे त्यांनाही या क्षेत्रात यावं असं वाटलं. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस किंवा आयपीएस होण्याचे असते. पण हरचरण यांनी स्टेट पोलीस सर्व्हिसेस म्हणजे पीसीएस परीक्षा उत्तीर्ण करून डीएसपी म्हणून पंजाब पोलिसात प्रवेश केला.
advertisement
SPS प्रमोशननंतर IPS
एसपीएस अधिकारी म्हणून त्यांनी संगरूर, मोहाली, गुरदासपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम पाहिलं. मोहालीचे एसएसपी असताना त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणली. २०१६ मध्ये यूपीएससीच्या शिफारशीनुसार एसपीएसमधून त्यांना आयपीएसपदी पदोन्नती मिळाली. २०२३ मध्ये त्यांना डीआयजी रँक मिळाली. रोपड रेंजमध्ये त्यांनी ड्रग्जविरोधात मोहीम राबवली आणि अनेक अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवले. ते SAD नेते बिक्रम सिंह मजीठिया यांच्या ड्रग्ज प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख देखील होते.
advertisement
८ लाखांची लाच, घरात ७ कोटींची रोकड
११ ऑक्टोबर २०२५ रोजी एका भंगार व्यावसायिकाने चंदीगड सीबीआय कार्यालयात तक्रार केली. डीआयजी भुल्लर यांनी खोट्या एफआयआरमध्ये अडकवण्याची धमकी देऊन ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्याने केला. सीबीआयने १० दिवसांच्या पाळत ठेवली आणि १६ ऑक्टोबर रोजी मोहाली येथील कार्यालयात ५ लाखांचा पहिला हप्ता घेताना भुल्लर यांना रंगेहाथ पकडले.
advertisement
सीबीआयने दिल्ली-चंदीगडमधून पथके बोलावून मोहाली कार्यालय, सेक्टर-४० येथील निवासस्थान आणि खन्ना येथील फार्महाऊसवर छापे टाकले. या छाप्यात त्यांच्या कोठीतून तीन बॅग आणि दोन अटॅचीमध्ये ७ कोटी रुपयांची रोकड सापडली. याव्यतिरिक्त, १.५ किलो सोने, २२ आलिशान घड्याळे, ४० लिटर विदेशी दारू, पिस्तूल, रिव्हॉल्वर तसेच बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसारख्या लक्झरी गाड्या आणि १५ मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/मनी/
वडील DGP, UPSC परीक्षा न देताच IPS, घरात सोन्याचं घबाड अन् 7 कोटींच्या नोटा सापडलेले DIG कोण?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement