हात थकले, घाम सुटला तरी मशीन थांबेना! नोटा मोजून मोजून डोळे पांढरे व्हायची वेळ, सलग दुसऱ्या दिवशी सर्वात मोठी रेड

Last Updated:
CBIने रितेन कुमार सिंह यांना १० लाख लाच घेताना पकडले. गुवाहाटी, गाझियाबाद, इम्फाळमध्ये छाप्यात कोट्यवधी मालमत्ता, २.६२ कोटी रोख, लक्झरी फ्लॅट्स जप्त.
1/7
हात थकले, घाम सुटला तरी नोटा संपेना, मशीन गरम झालं तरी अजून नोटा येत होत्या. DGP अधिकाऱ्याच्या रेडनंतर सलग दुसऱ्या दिवशी मोठी छापेमारी करण्यात आली. या धाडसत्रामध्ये कोट्यवधी रुपये, चांदी, प्लॉटची कागदपत्र आणि बँक, ट्रंका भरुन पैसे सापडले आहे. हा सगळा ऐवज पाहून अधिकारी देखील चक्रावले आहेत.

advertisement
2/7
CBI राष्ट्रीय महामार्ग आणि अवसंरचना विकास निगम लिमिटेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईत भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता जप्त केली. एनएचआयडीसीएलच्या गुवाहाटी क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी संचालक रितेन कुमार सिंह यांना १४ ऑक्टोबर रोजी १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

3/7
अटक केल्यानंतर सीबीआयने अधिकारी मैसनाम रितेन कुमार सिंह यांच्यासह व्यावसायिक बिनोद जैन यांच्या कार्यालय आणि निवासी परिसरांची कसून तपासणी केली. या तपासणीत सीबीआयला मोठा धक्का बसला. घरातून २.६२ कोटी रुपये रोख आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

4/7
ही लाच आसाममधील एनएच-३७ या प्रकल्पासाठी वेळ वाढवून देण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागण्यात आली होती. सीबीआयने अटक केल्यानंतर गुवाहाटी, गाझियाबाद आणि इम्फाळ येथील ठिकाणांवर छापे मारले. या छाप्यांमध्ये अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचा जो तपशील समोर आला आहे, तो थक्क करणारा आहे:

5/7
२.६२ कोटी रोख रक्कम, दिल्ली-एनसीआरमध्ये ९ लक्झरी फ्लॅट, १ प्रीमियम ऑफिस स्पेस आणि ३ निवासी प्लॉट, बेंगळुरूमध्ये १ फ्लॅट आणि १ प्लॉट, गुवाहाटीमध्ये ४ फ्लॅट आणि २ प्लॉट, इंफाळ वेस्टमध्ये २ होमस्टेड प्लॉट आणि १ शेतजमीन अधिग्रहणाची कागदपत्रे, ६ लक्झरी वाहनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे. दोन महागड्या घड्याळं आणि चांदीचे बार एवढी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

6/7
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कागदपत्रांमध्ये या मालमत्तांची किंमत कमी दाखवण्यात आली आहे, परंतु त्यांची वास्तविक बाजार किंमत (Market Value) अनेक पटीने जास्त आहे. या संपूर्ण प्रकरणात भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग झाल्याची शक्यता तपास यंत्रणेला वाटत आहे.

7/7
एनएचआयडीसीएलच्या या अधिकाऱ्याने एका खासगी कंपनीला त्यांच्या चालू कामात मदत करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली असल्याची गोपनीय माहिती सीबीआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीबीआयने १४ ऑक्टोबर रोजी सापळा रचला आणि कार्यकारी संचालक मैसनाम रितेन कुमार सिंह यांना १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement