मोबाइल हॅक, अश्लील VIDEO अन् अख्ख्यं कुटुंब ब्लॅकमेल, कल्याणमध्ये 29 वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार

Last Updated:

कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथं एका तरुणाने आपल्या प्रेयसीविरोधात अमानुषतेचा कळस गाठला आहे.

News18
News18
कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथं एका तरुणाने आपल्या प्रेयसीविरोधात अमानुषतेचा कळस गाठला आहे. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचा मोबाइल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली. तसेच अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं आहे. तसेच आरोपीनं पीडितेच्या आई वडील आणि भावाला देखील धमकी दिली.
या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याने आपलं राजकीय वजन वापरून पीडित तरुणीविरोधातच चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पण आता त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

advertisement
खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे मागील काही काळापासून प्रेमसंबंधात होते. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत तरुणीशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. याच वेळी आरोपीनं पीडितेच्या नकळत तिचे खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केले. तसेच त्याने तरुणीचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरुणीच्या आई-वडील आणि भावाला धमक्या देऊन ब्लॅकमेल केलं. आरोपीकडून सतत दबाव येत असताना, एके दिवशी आरोपीचा मोबाईल तरुणीच्या हाती लागला. त्यात तिचेच नव्हे, तर इतर मुलींचेही अश्लील व्हिडिओ सापडले.
advertisement

तरुणीवरच चोरीचा आरोप

हे व्हिडिओ पाहून तरुणी हादरली पण तिने त्याचा मोबाईल आपल्याकडे ठेवला. ही बाब उघड झाल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी तरुणीच्या आई-वडिलांना आणि भावांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आपले राजकीय बळ वापरत पोलिसांकडे जाऊन उलट तरुणीवर मोबाईल चोरीचा आरोप केला. मात्र पोलिसांनी तरुणीची विचारपूस केल्यानंतर सत्य समोर आलं. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आरोपीच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ लागले.
advertisement
यानंतर पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात आरोपी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्याचं कळताच आरोपी फरार झाला असून खडकपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आरोपीनं अशाप्रकारे तरुणीचा आणि तिच्या कुटुंबीयांचा छळ केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
मोबाइल हॅक, अश्लील VIDEO अन् अख्ख्यं कुटुंब ब्लॅकमेल, कल्याणमध्ये 29 वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार
Next Article
advertisement
Beed Crime News : कामाचं आमिष दाखवलं,  बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं!
कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं
  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

View All
advertisement