बायको किंवा आईच्या नावावर घ्या घर, लाखभर रुपये वाचतील, मोदी सरकारची मोठी घोषणा

Last Updated:

रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांची देवाणघेवाण होते आणि घरांच्या किमतीही वाढत चालल्या आहेत.

(पंतप्रधान आवास योजना)
(पंतप्रधान आवास योजना)
मुंबई: स्वतःचं घर बांधण्याचं/खरेदी करण्याचं स्वप्न जवळपास प्रत्येकाने पाहिलेलं असतं. घर खरेदी करणं हे काही सोपं काम नव्हे. कित्येक वर्षं कष्ट करून पैसे गाठीशी बांधल्यानंतर हे घराचं स्वप्न सत्यात उतरवू शकतो. तरीही ते कर्जाशिवाय घेणं बहुतांश जणांना शक्य नसतंच. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घर खरेदी करणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय 2024च्या बजेटमध्ये जाहीर केला आहे. महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास रजिस्ट्रीच्या वेळी आकारल्या जाणाऱ्या स्टॅम्प ड्युटीत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा उपयोग मोठ्या लोकसंख्येला होणार आहे. महिलांच्या नावावर घर खरेदी केलं जात असेल, तर स्टॅम्प ड्युटी कमी आकारण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. या व्यतिरिक्त केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये घराच्या संदर्भात आणखीही अनेक घोषणा केल्या आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांची देवाणघेवाण होते आणि घरांच्या किमतीही वाढत चालल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर आकारली जाणारी स्टॅम्प ड्युटी हे यामागचं एक कारण असल्याचं बऱ्याच काळापासून बोललं जातं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, की स्टँप ड्युटीचे दर सर्वांसाठीच कमी करण्याचं केंद्र सरकार राज्यांना सांगत आहे. तसंच, महिलांच्या नावावर खरेदी करण्यात आलेल्या प्रॉपर्टीवर कमी स्टँप ड्युटी आकारण्यासाठी विचार करण्याबद्दल प्रोत्साहन दिलं जात आहे. काही राज्यांमध्ये प्रॉपर्टीच्या रजिस्टर्ड मूल्याच्या आधारावर स्टँप ड्युटीचे दर एकसमान आहेत. काही राज्यांमध्ये स्लॅब मेकॅनिझमवर आधारित दर आहेत. त्यात खरेदी केल्या जाणाऱ्या प्रॉपर्टीच्या मूल्यानुसार दर वाढतात. ईशान्येकडची राज्यं आणि काही पर्वतीय राज्यं सर्वसाधारणपणे जास्त स्टॅम्प ड्युटी आकारतात.
advertisement
पीएम आवास
यंदाचं बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गावं आणि शहरांमध्ये तीन कोटी घरं बांधली जातील. आगामी पाच वर्षांमध्ये शहरी घरांसाठी 2.2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय साह्याचा प्रस्तावही ठेवला आहे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचं सांगून, या योजनेअंतर्गत 1.8 कोटी जणांनी रजिस्ट्रेशन केल्याची माहिती त्यांनी दिली.
advertisement
रेंटचं ओझं कमी करण्याची घोषणा
शहरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी रेंटचं ओझं कमी होण्याच्या दृष्टीने अर्थमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकार शहरांमध्ये रेंटल हाउसिंग विकसित करणार आहे. या हाउसिंग स्कीम्स मोठ्या कंपन्या आणि कारखान्यांच्या जवळपास उभारल्या जातील. त्यामुळे त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना स्वस्त भाड्यात घर मिळू शकेल. या हाउसिंग स्कीम पीपीपी तत्त्वावर उभारल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
view comments
मराठी बातम्या/मनी/
बायको किंवा आईच्या नावावर घ्या घर, लाखभर रुपये वाचतील, मोदी सरकारची मोठी घोषणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement