शिक्षण फक्त आठवी पास, पण 2 एकरात महिन्याला कमवतोय 3 लाखांचा नफा; काय करतोय हा व्यक्ती?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Business success story - 38 वर्षीय प्रातापभाई यांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि मागील 4 वर्षांपासून ते शेतीसोबत पशुपालन व्यवसाय करत आहेत. त्यांची प्रत्येक म्हैस चांगल्या जातीची आहे आणि त्यांच्या माध्यमातून दररोज 300 लीटर दूध उत्पादन होते.
अमरेली - शिक्षणामुळे चांगली नोकरी मिळते आणि व्यक्ती आयुष्यात आपले स्वप्न साकार करू शकतो, असे म्हणतात. मात्र, कमी शिक्षण असेल आणि जिद्द असेल, मेहनत घ्यायची तयारी असेल तरीही व्यक्ती आयुष्यात अत्यंत चांगली कमाई करू शकतो, हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. हा तरुण फक्त आठवी पास आहे. मात्र, आज तो महिन्याला 3 लाख रुपये कमावत आहे. जाणून घेऊयात, त्याच्या यशाची कहाणी.
प्रातापभाई बसीया असे या तरुणाचे नाव आहे. ते गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील नेसडी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी 2 एकरात एक तबेला तयार केला आहे. यात 70 म्हशी आहेत. या म्हशींच्या माध्यमातून 8 लाख रुपयांचे दूध उत्पादन होते. सर्व खर्च काढल्यावर प्रत्येक महिन्याला त्यांना 3 लाख रुपयांचा नफा होत आहे.
advertisement
38 वर्षीय प्रातापभाई यांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि मागील 4 वर्षांपासून ते शेतीसोबत पशुपालन व्यवसाय करत आहेत. त्यांची प्रत्येक म्हैस चांगल्या जातीची आहे आणि त्यांच्या माध्यमातून दररोज 300 लीटर दूध उत्पादन होते.
प्रातापभाई बसीया यांनी लोकल18 शी बोलताना सागितले की, त्यांच्या तबेल्यात 70 म्हशी आहेत. त्यांनी अमरेली, गीर सोमनाथ, पोरबंदर, भावनगर आणि जूनागढ जिल्ह्यातून या म्हशी खरेदी केल्या आहेत. एका म्हशीची किंमत ही 1 लाखापासून ते 2.90 लाख रुपयांपर्यंत आहे. सर्वात उत्तम जातीची म्हैस दररोज 20 ते 25 लीटर दूध देते. त्यांनी शेतातच एक तबेला बांधला असून, तेथे 8 जण काम करतात. म्हशींना बसण्यासाठी आरसीसी आसन व्यवस्थेसह दिवे व पंख्यांची सोय या तबेल्यात केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
70 म्हशींच्या माध्यमातून त्यांना दररोज 300 लीटर दुधाचे उत्पादन होते. हे दूध सावरकुंडलामध्ये डॅनिव डेअरी, नेसडी गाव आणि इतर परिसरात पोहोचवला जातो. एक लीटर दुधाची सरासरी किंमत 90 रुपये आहे. दररोज सुमारे 25,000 ते 27,000 रुपयांची विक्री होते. अशा प्रकारे महिन्याभरात 7 ते 8 लाख रुपयांच्या दुधाची विक्री होते.
advertisement
तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांना दर महिन्याला 1.30 लाख रुपयांचे वेतन दिले जाते. याशिवाय अतिरिक्त डॉक्टर, औषधे आदींवर चार लाख रुपये खर्च केले जातात. सर्व खर्च काढल्यानंतर दरमहा सुमारे 3 लाख रुपये निव्वळ नफा होतो, असे ते म्हणाले. तर दुधाशिवाय प्रातापभाई म्हशीचे शेण विकूनही पैसे कमावतात. शेणाचा एक ट्रॅक्टर ते 1500 रुपयांना विकतात. दररोज म्हशींना सकाळ-संध्याकाळ 5 किलो ढेप आणि 8 ते 12 किलो हिरवा चारा दिला जातो. त्यामुळे दुधाची गुणवत्ता सुधारते आणि लोकांची मागणीही वाढते, असे त्यांनी सांगितले.
Location :
Amreli,Gujarat
First Published :
November 06, 2024 1:19 PM IST
मराठी बातम्या/मनी/
शिक्षण फक्त आठवी पास, पण 2 एकरात महिन्याला कमवतोय 3 लाखांचा नफा; काय करतोय हा व्यक्ती?