Eyewear Insurance : आता चष्म्याचाही काढता येणार इन्शुरन्स! नुकसान झाल्यास कंपनी देणार भरपाई

Last Updated:

‘हेल्थ इन्शुरन्स’, ‘कार इन्शुरन्स’ आणि ‘लाईफ इन्शुरन्स’ आपल्यापैकी अनेकजण काढतात; पण चष्म्याचाही ‘इन्शुरन्स’ काढता येतो हे तुम्हाला माहिती आहे का?

आता चष्म्याचाही काढता येणार इन्शुरन्स! नुकसान झाल्यास कंपनी देणार भरपाई
आता चष्म्याचाही काढता येणार इन्शुरन्स! नुकसान झाल्यास कंपनी देणार भरपाई
‘इन्शुरन्स’ अर्थात विमा हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ‘हेल्थ इन्शुरन्स’, ‘कार इन्शुरन्स’ आणि ‘लाईफ इन्शुरन्स’ आपल्यापैकी अनेकजण काढतात; पण चष्म्याचाही ‘इन्शुरन्स’ काढता येतो हे तुम्हाला माहिती आहे का? अलीकडे लहान मुलांचे ऑनलाईन क्लास आणि मोठ्यांचं ऑनलाईन काम यांमुळे चष्म्यांची मागणी प्रचंड वाढली आहे.
बरं मागणी प्रचंड आहे म्हणून चष्मे स्वस्त आहेत असंही नाही. त्यामुळे चष्मा खरेदी खिसा चांगलाच हलका करणारी ठरते. अशा वेळी चष्मा बिघडला किंवा चोरीला गेला तर ते महागात पडतं. त्यामुळे ‘आयविअर अ‍ॅश्युअर कव्हर’ ला मागणी वाढत आहे. ही मागणी ओळखून ‘युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स’ या कंपनीने चष्म्यासाठी विमा पॅालिसी आणली आहे. युनिव्हर्सल सोम्पो इंडियन बँक, इंडियन ओव्हसीज बँक, कर्नाटक बँक, डाबर इन्व्हेस्टमेंट्स आणि सोम्पो जपान इन्शुरन्स आयएनसी यांचा संयुक्त उद्योग आहे.
advertisement
नंबरचा चष्मा, उन्हापासून संरक्षणासाठी वापरला जाणारा गॅागल किंवा सनग्लासेस, ब्लू आयविअर फिल्टर आणि कॅान्टॅक्ट लेन्स यांच्यासाठी सोम्पो जनरल इन्शुरन्सकडून विमा काढणं शक्य आहे. 500 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत किंमत असलेल्या चष्म्याचा विमा तुम्ही उतरवू शकता. चष्म्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर पॉलिसीचा प्रीमिअम 100 रुपये आहे. ही पॅालिसी ग्रुप आणि वैयक्तिक स्वरुपात उपलब्ध आहे.
advertisement
या पॅालिसीमध्ये चष्म्याची चोरी झाल्यास किंवा आग, वादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे चष्मा हरवला किंवा खराब झाला असता नुकसान भरपाई मिळू शकते. प्राणी किंवा वाहन यांच्या संपर्कात आल्यामुळे चष्म्याचं काही नुकसान झालं असता किंवा अपघातात चष्मा खराब झाला असता एक वर्ष या इन्शुरन्स कव्हरमध्ये तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इन्शुरन्समध्ये भारतात किंवा भारताबाहेरही चष्म्याचं झालेलं नुकसान भरुन येणार आहे. विम्याची किंमत इनव्हॅाइस रक्कम ही ग्राहकाच्या पसंतीप्रमाणे हवी तेवढी कमी असू शकते.
advertisement
तुमचा चष्मा एक वर्ष जुना असेल तर त्यासाठी हा इन्शुरन्स घेता येणार नाही. चष्मा वापरताना तुमच्याकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे चष्म्याचं काही नुकसान झालं असेल तर किंवा नियमित वापरामुळे झालेली मोडतोड किंवा बेवारस वाहनातून चष्मा चोरीला गेला तर इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नसल्याचं विमा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याही उपर जेंव्हा अशी पॉलिसी खरेदी कराल तेंव्हा त्यातील अटी-शर्ती नीट वाचून मगच ती खरेदी करा.
मराठी बातम्या/मनी/
Eyewear Insurance : आता चष्म्याचाही काढता येणार इन्शुरन्स! नुकसान झाल्यास कंपनी देणार भरपाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement