Fastag Rule Change : Fastag चा बदलला नियम, फास्टॅग असेल तरीही भरावा लागेल दुप्पट टोल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Fastag Rule Change : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI ने एक नवीन नियम लागू केला आहे. तुमच्याकडे फास्टॅग असेल किंवा नसेल तरीही तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
मुंबई : तुमच्याकडे फास्टॅग असेल किंवा नसेल तरीही तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ज्यांच्याकडे फास्टॅग आहे त्यांच्यासाठी त्याचा नियम (Fastag Rule Change) बदलला आहे. ज्यांनी अजूनही तो काढलेला नाही त्यांनी तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जे फास्टॅग सुरू करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. इतकच नाही तर दुप्पट रक्कम टोल म्हणून आकारली जाणार आहे.
तुमच्या कारने हायवेवर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI ने एक नवीन नियम लागू केला आहे. याअंतर्गत ज्यांच्या वाहनांमध्ये फास्टॅग नाही त्यांच्याकडून दुप्पट टोल टॅक्स आकारला जाणार आहे. यासंदर्भात NHAI कडून निवेदन जारी करण्यात आलं आहे.
काही लोक अजूनही विंडस्क्रीनवर फास्टॅग (Fastag) लावलेला नाही. त्यांना या सूचना देण्यात आला आहेत. लोक त्यांच्या कार किंवा इतर वाहनांच्या विंडस्क्रीनवर जाणूनबुजून फास्टॅग चिकटवत नाहीत, यावर कठोर कारवाई करण्यासाठी NHAI ने फास्टॅग संदर्भात नवीन नियम लागू केला आहे. आता जाणूनबुजून विंडस्क्रीनवर फास्टॅग न लावणाऱ्यांकडून अधिक कर वसूल केला जाईल.
advertisement
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की विंडस्क्रीनवर फास्टॅग न लावल्याने टोल प्लाझावर खूप वेळ जातो. रांगेत उभ्या असलेल्या इतर वाहनांना त्रास होतो. या संदर्भात प्राधिकरणाने एसओपी जारी केला असून त्याअंतर्गत आता अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल टॅक्स वसूल केला जाईल. जे नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं प्राधिकरणाने म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 19, 2024 9:50 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Fastag Rule Change : Fastag चा बदलला नियम, फास्टॅग असेल तरीही भरावा लागेल दुप्पट टोल