घरीच बनवलं सेंद्रिय तूप, आता देशातला प्रसिद्ध ब्रँड, दोघा मित्रांनी कशी केली कमाल?

Last Updated:

Food Business: घरगुती स्वरुपात दोघा मित्रांनी सुरु केलेला तुपाचा व्यवसाय आता देशातील प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. संजीवनी तुपाच्या माध्यमातून ते लाखोंची कमाई करत आहेत.

+
घरीच

घरीच बनवलं सेंद्रिय तूप, आता देशातला प्रसिद्ध ब्रँड, दोघा मित्रांनी कशी केली कमाल?

निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्रातील गाव-खेड्यांतून अनेक तरुण नोकरीच्या शोधात मुंबईचा रस्ता धरतात. तर काहीजण मुंबईत जाऊन स्वत:चं एक वेगळं उद्योगविश्व उभारतात. सध्याच्या काळात मुंबईत अनेक मराठी तरुण पारंपरिक व्यवसायांना आधुनिकतेची जोड देत यशस्वी उद्योजक होत आहेत. कल्याणमधील नरेंद्र रेडेकर आणि बाळू आव्हाड हे दोघे मित्र यापैकीच एक आहेत. दोघांनी एकत्र येत गावच्या दुधापासून तूप बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. ‘संजीवनी तूप’ या ब्रँडपासून ते चांगली कमाई करत आहेत. याबाबतच लोकल18 च्या माध्यमतून जाणून घेऊ.
advertisement
कल्याणमधील नरेंद्र रेडेकर मुळचे कोल्हापूर आणि बाळू आव्हाड मूळचे नाशिकचे आहे. या दोघांनी गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित शेती व्यवसाय जपला होता. त्यांची गावच्या ठिकाणी शेत जमीन होती. त्या जमिनीचा संभाळ करत 17 वर्षांपासून दोघे मित्र दुग्ध व्यवसाय करत आहेत. मात्र गेल्या वर्षभरापूर्वी त्यांनी त्यांचा दुधाचा व्यवसाय वाढवत तुपाचा व्यवसाय करण्याचा ठरवले. त्यानुसार त्यांनी घरातूनच व्यवसाय सुरू केला.
advertisement
कसा सुरू झाला सेंद्रिय तुपाचा ब्रँड?
“आमच तुपाचा व्यवसाय कुठून सुरू करावा यासाठी आम्ही खूप अभ्यास आणि रिसर्च केला. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या सेंद्रिय आणि इतर पदार्थ युक्त असलेले तूप पाहिले. तेव्हा आमच्या लक्षात आले की बाजारात मिळणारे तूप हे दुधाच्या क्रीम पासून तयार केले जाते. त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळं करत, घरीच सेंद्रिय पद्धतीने तूप बनवायचे. मग आम्ही या सर्वच दुधाच्या पदार्थांचा अभ्यास केला. सुरुवातीला घरच्या घरी बनवलेले तूप आम्ही मित्र परिवाराला दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी दिले. या तुपाला इतका उत्तम प्रतिसाद लाभला की अनेक मित्रांनी आम्हाला तुपाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातूनच संजीवनी तूप या सेंद्रिय ब्रँडची निर्मिती झाली,” असं बाळू आव्हाड सांगतात.
advertisement
नोकरी सांभाळत व्यवसाय
आज या दोन्ही मित्रांनी दुधाच्या व्यवसायाचा विस्तार करत तुपाचा व्यवसाय सुरू केला आहे. आय टी क्षेत्राची नोकरी सांभाळत काहीतरी वेगळं करावं या दृष्टीने यांनी घरच्या घरी तूप बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. घरातून सुरू झालेला हा तुपाचा व्यवसाय आता  देशभर पसरला आहे. महाराष्ट्र नव्हे तर देशभरात या दोन्ही मित्रांनी बनवलेल्या संजीवनी तुपाला मागणी आहे. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करून निर्णय घ्यावा. असे केल्यास तुमची मेहनत वाया जात नाही, याचं उदाहरणच या दोघा मित्रांनी घालून दिलंय.
मराठी बातम्या/मनी/
घरीच बनवलं सेंद्रिय तूप, आता देशातला प्रसिद्ध ब्रँड, दोघा मित्रांनी कशी केली कमाल?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement