Freedom SIP म्हणजे काय? नॉर्मल प्लॅनपेक्षा जास्त फायदे मिळतात का? जाणून घ्या डिटेल्स

Last Updated:

Freedom SIP गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी अधिक नियंत्रण प्रदान करु शकते. यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनअंतर्गत गुंतवणूक करायची असते. एसआयपीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅनअंतर्गत पैसे काढण्याचा ऑप्शनही मिळतो.

फ्रिडम एसआयपी
फ्रिडम एसआयपी
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करुन दीर्घ कालावधीत तुम्ही कोट्यवधीचा फंड सहज जमा करु शकतात. चांगलं रिटर्न मिळवण्यासाठी जास्तीत जास्त फायनेंशियल एक्सपर्ट देखील यामध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नवीन गुंतवणूकदारांसाठी एक आणखी सोपं ऑप्शन आलं आहे. आता मार्केटमध्ये फ्रीडम एसआयपीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. फ्रीडम एसआयपी गुंतवणूकदारांना पॅटर्नमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते आणि त्यांच्यासाठी अनेक फायदे प्रदान करते. ते काय आहे आणि त्यात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते ते आपण जाणून घेऊया.
काय आहे फ्रीडम एसआयपी?
फ्रीडम एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही एसआयपी संपण्याच्या कालावधीनंतर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एका ठरलेल्या वेळी निश्चित रक्कम प्राप्त करु शकता. फ्रीडम एसआयपी गुंतवणूकदारांसाठी नवा द्वार ओपन करु शकते आणि त्यांना त्यांचे आर्थिक लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी अधिक नियंत्रण प्रदान करु शकते. काही काळापूर्वी पहिलेच आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडने आयसीआयसीआय प्रुडेंशियल फ्रिडम एसआयपी लॉन्च केली आहे. यानंतरपासूचन फ्रीडम एसआयपीविषयी चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
फ्रीडम SIP चे फायदे
फ्रीडम एसआयपीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, ते गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि आर्थिक स्वातंत्र्यानुसार गुंतवणूक करू देते. शिवाय, गुंतवणूकदार त्यांच्या गरजा आणि उद्दिष्टांवर आधारित त्यांची गुंतवणूक रक्कम निवडू शकतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. याव्यतिरिक्त, हे गुंतवणूकदारांना साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक आवश्यकतांनुसार गुंतवणूक करण्याची लवचिकता देते. यामुळे त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होते.
advertisement
सिस्टेमॅटिक विड्रॉलचा पर्यायही मिळतो
फ्रीडम SIP मध्ये तुम्हाला SWP चा ऑप्शन देखील मिळेल. हे एक फीचर आहे ज्यामध्ये तुम्ही SIP द्वारे ठराविक वेळेच्या अंतराने रक्कम जमा करता, सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅनमध्ये, ठराविक रक्कम म्युच्युअल फंडातून ठराविक वेळी काढता येते. यासाठी प्रथम तुम्हाला एसआयपी सुरू करावी लागेल. यानंतर, आपल्या सोयीनुसार कालावधी निवडावा लागेल. SIP कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्विच करू शकता. यानंतर पैसे काढण्याची योजना सुरू होईल.
मराठी बातम्या/मनी/
Freedom SIP म्हणजे काय? नॉर्मल प्लॅनपेक्षा जास्त फायदे मिळतात का? जाणून घ्या डिटेल्स
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement