Income Tax भरणाऱ्यांसाठी गुडन्यूज! आता पहिल्यापेक्षा कमी भरावा लागेल टॅक्स

Last Updated:

सीबीडीटीने केंद्र किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कर्मचारी, जे कंपनीच्या मालकी हक्काच्या घरात राहतात त्यांच्या व्हॅल्यूएशनच्या मूल्यांकनात बदल केला आहे. नवीन नियम 1 सप्टेंबरपासून प्रभावी झाले आहेत.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : रेंट फ्री हाउससाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने पगारदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. याअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीने भाडे-मुक्त घर उपलब्ध केलं आहे. ते आता जास्त बचतीसह अधिक वेतन प्राप्त करु शकतील. कारण आयटी डिपार्टमेंटने रेंट-फ्री अकोमोडेशनशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. जे 1 सप्टेंबरपासून प्रभावी झाले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आयकर नियमांमध्ये सुधारणा आधीच अधिसूचित केल्या आहेत. CBDT नुसार, कंपनीच्या मालकीच्या घरात राहणारे केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी सोडून इतर कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनात बदल करण्यात आला आहे.
नवीन नियमांमध्ये काय?
आयकर विभागाने कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या भाड्याच्या मोफत निवासाचे मूल्यांकन करण्यासाठी नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, जिथे नियोक्त्याकडून कर्मचाऱ्यांना अनफर्निश निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते आणि अशा निवासस्थानाची मालकी कंपनीकडेच असते, तेव्हा त्याचे मूल्यांकन आता वेगळ्या पद्धतीने केले जाईल. नवीन नियमांनुसार, आता शहरी भागात ज्यांची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 40 लाखांपेक्षा जास्त आहे, तेथे HRA वेतनाच्या 10 टक्के असेल. यापूर्वी 2001 च्या जनगणनेनुसार ते 15 टक्के होते.
advertisement
एकेएम ग्लोबल टॅक्स पार्टनरच्या अमित माहेश्वरी यांनी म्हटलं की, 'जे कर्मचारी पर्याप्त वेतन घेत आहेत आणि नियोक्त्याकडून मिळालेल्या घरात राहत आहेत. ते आता जास्त बचत करण्यात सक्षम होतील. कारण सुधारीत दरांसह त्यांचा टॅक्सेबल बेस आता कमी होत आहे. अशा वेळी त्यांच्या घराचे मूल्य आता कमी होईल आणि सॅलरीमध्ये वाढ होईल.' एएमआरजी अँड असोसिएट्सचे सीईओ गौरव मोहन यांच्या मते, एचआरएचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टॅक्सेबल सॅलरीमध्ये कपात होईल, ज्यामुळे नेट टेक-होम सॅलरी वाढेल. यामुळे एकीकडे कर्मचार्‍यांची बचत वाढेल तर दुसरीकडे सरकारचा महसूल कमी होईल.
मराठी बातम्या/मनी/
Income Tax भरणाऱ्यांसाठी गुडन्यूज! आता पहिल्यापेक्षा कमी भरावा लागेल टॅक्स
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement