advertisement

6 महिन्यांत 21000 रुपयांचा प्रॉफिट, सोनं घसरलं तर चांदीही 1000 रुपयांनी स्वस्त

Last Updated:

सोन्याचे दर घसरले, 1000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, तुमच्या शहरात काय आहेत दर?

News18
News18
मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठा चढ उतार पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. 2 जुलै रोजी बुधवारी सराफ मार्केटमध्ये सोन्याच्या दरात 173 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे तर चांदीचे दरही 1000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 5900 रुपये आहे. GST सह 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख रुपये तोळावर पोहोचले आहेत. चांदी 1 लाख 9 हजार 77 रुपये प्रति किलो विकली जात आहे.
आयबीजेएकडून आलेल्या दरांनुसार 23 कॅरेट सोने देखील 172 रुपयांनी घसरून 96868 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 159 रुपयांनी घसरून 87089 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत देखील 130 रुपयांनी स्वस्त झाली आणि 72943 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जचा समावेश करण्यात आला नाही. प्रत्येक ज्वेलर्स मेकिंग चार्ज वेगवेगळे घेतो त्यामुळे हे दर बदलण्याची शक्यता आहे.
advertisement
सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ने जारी केल्या आहेत. त्यावर जीएसटी आकारला जात नाही. तुमच्या शहरात 1000 ते 2000 रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी 12 वाजता आणि दुसरे संध्याकाळी 5 वाजता. या वर्षी सराफा बाजारात सोने सुमारे 21517 रुपयांनी आणि चांदी 18883 रुपयांनी महाग झाली आहे. 31 डिसेंबर रोजी सोने प्रति तोळा 76045 रुपये आणि चांदी 85680 रुपये प्रति किलो वर होते. सहा महिन्यांनी 1 लाख रुपयांच्या आसपास GST सह सोनं पोहोचलं आहे.
advertisement
फिजीकल गोल्ड बाबत बोलताना, बँकेने म्हटले की सोन्याच्या किमतीत $3500 पेक्षा जास्त वाढ झाल्याने बाजारपेठेत, विशेषतः भारत आणि चीनसारख्या अर्थव्यवस्थांमध्ये दागिने (Gold Jewellery), सोन्याची नाणी आणि लहान बारची (Gold Bar) मागणी कमी होऊ शकते.
एचएसबीसीने उच्च जोखीम आणि सरकारी कर्जाचा हवाला देत 2025 साठीचा सरासरी सोन्याच्या किमतीचा अंदाज देखील वाढवला आहे. ते $3015 वरून $3215 प्रति औंस करण्यात आले आहे. पुढील वर्षासाठी म्हणजे 2026 साठी, सोन्याचा अंदाज 2915 डॉलर वरून 3125 डॉलर प्रति औंस करण्यात आला आहे. आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाच्या काळात सोने चांगला परतावा देतो. ज्यामुळे एप्रिलच्या अखेरीस स्पॉट गोल्ड 3500.05 डॉलर प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर पोहोचले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
6 महिन्यांत 21000 रुपयांचा प्रॉफिट, सोनं घसरलं तर चांदीही 1000 रुपयांनी स्वस्त
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement