Gold Price Today: बापरे! दिल्लीत 162110 वर पोहोचलं सोनं, मुंबईत 24 आणि 22 कॅरेटचा दर काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
प्रजासत्ताक दिनानंतर सोनं आणि चांदीच्या दरात तुफान वाढ झाली. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोनं 1 लाख 62 हजार 110 रुपयांवर, चांदी 3,60,100 रुपये किलोवर पोहोचली.
सोनं आणि चांदी आता फक्त रिल्सवर पाहायचं, दुकानांच्या बाहेरुनच पाहायचं, कारण आता खरेदी करण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहे. प्रजासत्ताक दिनानंतर सोन्या-चांदीच्या दरात तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. एकेकाळी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय' मानलं जाणारं सोनं आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलं आहे. मंगळवारी, 27 जानेवारी रोजी सोन्याच्या किमतीने नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 62 हजार,110 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. 10 ग्रॅमसाठी ग्राहकांना इतके पैसे समोजावे लागणार आहेत.
ज्यांच्या घरी लग्नसराई आहे किंवा ज्यांना सणासुदीला सोनं खरेदी करायचं आहे, अशा ग्राहकांच्या काळजाचा ठोका या दरवाढीने चुकला आहे. झोप उडाली आहे, सोनं खरेदी करायचं कसं हा प्रश्न पडला आहे. 14 आणि 18 कॅरेट सोन्याचा भावही न परवडणारा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 5000 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेल्यामुळे देशांतर्गत बाजारातही खळबळ उडाली आहे.
advertisement
| शहर | 22 कॅरेट सोन्याचे दर | 24 कॅरेट सोन्याचे दर |
| दिल्ली | 148610 | 162110 |
| मुंबई | 148460 | 161960 |
| अहमदाबाद | 148510 | 162010 |
| चेन्नई | 148460 | 161960 |
| कोलकाता | 148460 | 161960 |
| हैदराबाद | 148460 | 161960 |
| जयपूर | 148610 | 162110 |
| भोपाळ | 148510 | 162010 |
| लखनऊ | 148610 | 162110 |
| चंदीगड | 148610 | 162110 |
advertisement
दरवाढीचा ग्राहकांना शॉक
लग्नासाठी दागिने घडवायला सोनाराकडे गेलेल्या एका ग्राहकाने आपली व्यथा मांडली, काही महिन्यांपूर्वी बजेट आखलं होतं, पण आता सोन्याचे भाव पाहून दागिन्यांची संख्या कमी करावी लागत आहे. केवळ सोन्याचे दागिनेच नाही, तर चांदीनेही 3,60,100 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठून मध्यमवर्गीयांची चिंता वाढवली आहे. लग्नसराईत आता एक ग्रॅमचं मंगळसूत्र घालावं लागतं की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
advertisement
भाव अजून वाढणार? तज्ज्ञांचे धक्कादायक अंदाज
जागतिक घडामोडी पाहता ही भाववाढ इथेच थांबणार नाही, असे संकेत मिळत आहेत. सोसायटे जेनरलच्या अंदाजानुसार, वर्षाअखेरपर्यंत सोनं 6,000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतं. तर मॉर्गन स्टेनलीने 5,700 डॉलरचे लक्ष दिले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची 27-28 जानेवारीला होणारी बैठक आणि त्यात अपेक्षित असलेली व्याजदर कपात, यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा अधिकच वाढणार आहे.
advertisement
गुंतवणूकदारांची चांदी, सामान्यांची कोंडी
ज्यांनी आधी सोनं घेऊन ठेवलं आहे, त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. मात्र, नव्या खरेदीदारांसाठी ही दरवाढ 'दुष्काळात तेरावा महिना' ठरत आहे. सुरक्षितता म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल वाढला असला, तरी किमतीतील या अफाट वाढीमुळे 'सुवर्णयोग' जुळून येणे कठीण झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 8:54 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price Today: बापरे! दिल्लीत 162110 वर पोहोचलं सोनं, मुंबईत 24 आणि 22 कॅरेटचा दर काय?










