8वा वेतन आयोग लागू कधी, पगारवाढ किती? सर्वात ताजे अपडेट; कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला, नेमकी अडचण काय?

Last Updated:

8th Pay Commission Update: 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, त्याच्या अंमलबजावणीला उशीर होत असल्याने नाराजी वाढत आहे. सरकारकडून याबाबत नवे अपडेट समोर आले आहे.

News18
News18
नवी दिल्ली : सरकारने 8 व्या वेतन आयोगाची घोषणा केल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. कर्मचाऱ्यांना जितकी आतुरता त्यांच्या पगारात होणाऱ्या बदलाची आहे. तितकीच उत्सुकता आयोगाच्या स्थापनेला होत असलेल्या विलंबाबद्दलही आहे. सध्या सरकारने आयोगाची स्थापना कधी करणार हे स्पष्ट केलेले नाही. कारण आयोग स्थापन झाल्यावर त्याला अहवाल तयार करण्यासाठी वेळ लागेल. आयोगाच्या शिफारशींच्या आधारावरच पगारातील बदलांची रूपरेषा ठरवली जाईल.
advertisement
सध्या तज्ज्ञ आणि सरकारी सूत्रांनुसार 8 वा वेतन आयोग लागू झाल्यावर किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून वाढून 51,480 रुपये होऊ शकते. पगारातील बदलासोबतच केंद्रीय सरकार आरोग्य योजनेच्या जागी एक नवीन आरोग्य विमा योजना सुरू केली जाऊ शकते. लाईव्हमिंटनुसार या विमा योजनेत अधिक चांगल्या कव्हरेजची सोय उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. आयोगाच्या औपचारिक स्थापनेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कारण वित्तीय आणि प्रशासकीय आव्हानांमुळेच यात विलंब होत आहे.
advertisement
फायदा कधीपासून मिळणार?
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार- 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला विलंब होऊ शकतो. सरकार जरी याची अंमलबजावणी जानेवारी 2026 पासून करेल. तरी याचा लाभ मिळण्यास पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा 2027 च्या सुरुवातीपासूनच सुरुवात होईल. याचा अर्थ सरकार सुमारे 1 वर्षाची वाढ थकबाकीच्या (Arrears) स्वरूपात देण्याचा विचार करत आहे.
advertisement
आयोगाची स्थापना झाल्यावर अहवाल येण्यास सुमारे 1.5 वर्षे लागतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्यास 3 ते 9 महिन्यांचा कालावधी लागेल. या अहवालात असेही म्हटले आहे की- किमान वेतन 30 हजार रुपये होईल. ज्याचा अर्थ फिटमेंट फॅक्टर 1.8 असेल. ज्यामुळे एकूण पगारात 13 टक्के वाढ होईल.
advertisement
तिसऱ्या अहवालात वेगळे दावे
म्बिट कॅपिटलच्या अहवालानुसार वेतन आणि पेन्शनमध्ये 30-34% वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सुमारे 44 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. 7 व्या वेतन आयोगात 14 टक्के वाढ झाली होती. या अहवालात असे म्हटले आहे की-8 व्या वेतन आयोगासाठी 1.83 टक्के ते 2.46 टक्के पर्यंत फिटमेंट फॅक्टर लागू होऊ शकतो. मात्र या अहवालातही आयोगाच्या अंमलबजावणीला विलंब होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
अंमलबजावणीला विलंब का होत आहे?
8 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रशासकीय प्रक्रियेतून जावे लागणार आहे. तसेच यासाठी मोठ्या आर्थिक सहकार्याची देखील गरज आहे. त्यामुळे सरकारसाठी याची तात्काळ अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही. सध्या सरकार या आयोगाच्या स्थापनेसाठी सदस्य आणि अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेत गुंतले आहे. अर्थसंकल्पीय मंजुरी आणि वित्तीय शिफारशी आल्यानंतरच या आयोगाच्या स्थापनेचे काम सुरू केले जाईल.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
8वा वेतन आयोग लागू कधी, पगारवाढ किती? सर्वात ताजे अपडेट; कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला, नेमकी अडचण काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement