Currency : 'बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया'; भारतीय चलन हे रुपया असणार हे कोणी ठरवलं? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही

Last Updated:

हा प्रवास कसा होता? कोण होता तो शासक, ज्याने पहिल्यांदा या चांदीच्या नाण्याला 'रुपया' हे नाव दिले? चला, जाणून घेऊया

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : 'बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया' हे मजरूह सुल्तानपुरी यांनी लिहिलेले आणि 1976 च्या चित्रपटात वापरलेले गाणे आजही व्यंग्यात्मक म्हणीप्रमाणे वापरले जाते. पण भारतीय चलनात वापरला जाणारा आणि तुमच्या आमच्या खिशात असणारा रुपया हा भारताचा भाग कसा झाला कधी असा विचार केलाय? म्हणजे रुपयाच का भारतीय चलनासाठी वापरला जाऊ लागला? असा कधी प्रश्न पडला आहे? याची सुरुवात कशी आणि कुठून झाली? अनेकांना हे माहितच नाही. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
आज आपण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा चलनात आलेल्या भारतीय रुपयाच्या 75 व्या वर्धापन दिनी मुंबईतील 'सरमाया आर्ट फाउंडेशन'ने 'ओडिसी ऑफ द रुपी' नावाच्या एका खास प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात केवळ 75 वर्षांचा नाही, तर तब्बल 2500 वर्षांपूर्वी सुरू झालेला आपल्या 'रुपया'चा प्रवास अत्यंत रंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे.
हा प्रवास कसा होता? कोण होता तो शासक, ज्याने पहिल्यांदा या चांदीच्या नाण्याला 'रुपया' हे नाव दिले? चला, जाणून घेऊया
advertisement
प्रदर्शनातील बहुतेक नाणी ही सरमाया आर्ट फाउंडेशनचे संस्थापक पाल अब्राहम यांच्या वैयक्तिक संग्रहातील आहेत. इंडसइंड बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) राहिलेल्या 65 वर्षीय अब्राहम यांची नाण्यांमध्ये असलेली आवड त्यांच्या वडिलांनी लहानपणी त्यांना त्रावणकोर राज्याच्या नाण्यांनी भरलेला एक डबा भेट दिल्यावर सुरू झाली. तेव्हापासून, जुनी आणि दुर्मिळ नाणी गोळा करणे हेच त्यांचे ध्येय बनले.
advertisement
या छंदाला ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या ॲशमोलियन संग्रहालयाचे क्यूरेटर डॉ. शैलेंद्र भंडारे यांची साथ मिळाली. या दोघांनी अनेक महिने विचारविनिमय करून भारतीय रुपयाच्या 75 वर्षांच्या प्रवासावर ही आगळीवेगळी प्रदर्शनी आयोजित करण्याचे ठरवले.
15 ऑगस्ट, 1950 रोजी भारताच्या प्रजासत्ताकाचा पहिला रुपया जारी करण्यात आला होता. यावर सारनाथमधील सिंहस्तंभ हे राष्ट्रीय प्रतीक म्हणून कोरलेले होते.
advertisement
'रुपया'ची कथा कुठून सुरू झाली?
'रुपया'ची कथा थेट 500 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1538 पर्यंत जाते. मुघल सम्राट हुमायूंला हरवून जेव्हा अफगाण शासक शेरशाह सूरी याने उत्तर भारतावर आपले राज्य स्थापन केले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चलने वापरली जातात. या गोंधळात एकरूपता आणणे आवश्यक आहे, हे त्याने ओळखले आणि इथेच त्याने आपल्याद्वारे सुरू केलेल्या चलनाला प्रथमच 'रुपया' हे नाव दिले.
advertisement
'रौप्य' ते 'रुपया': 'रुपया' या शब्दाचा जन्म 'रौप्य' या संस्कृत शब्दातून झाला आहे, ज्याचा अर्थ चांदी असा आहे. सूरीने जारी केलेली ही नाणी चांदीची असल्याने, त्यांना 'रुपया' म्हटले जाऊ लागले.
मुघलांनी दिला 'रुपया'ला आधार
कालांतराने, मुघल शासकांनीही 'रुपया'ला त्यांच्या साम्राज्याचे औपचारिक चलन म्हणून स्वीकारले आणि यामुळे 'रुपया' हे एक विश्वसनीय मानक बनले. फक्त फरक एवढाच होता की, प्रत्येक शासकाने या चांदीच्या नाण्यांवर आपल्या साम्राज्याची वेगळी ओळख कोरली.
advertisement
उदा. शीख राजांनी त्यांच्या रुपयांवर पवित्र बोरीच्या झाडाची पाने कोरली, तर अवधच्या नवाबांनी आपल्या रुपयांवर दोन मासे (मच्छी) कोरले.
मुघल काळात शासक बदलले तसे रुपयांमध्येही बदल होत गेले. जेव्हा इंग्रजांचे वर्चस्व वाढले, तेव्हा हाताने बनवलेल्या नाण्यांची जागा मशीनने बनवलेल्या, अधिक कलात्मक नाण्यांनी घेतली.
भारताबाहेरही 'रुपया'चीच सत्ता
व्यापारी मार्गांनी 'रुपया'ने भारताबाहेरही प्रवास केला. पूर्व आफ्रिकेपासून मध्य पूर्व आशिया आणि आजच्या पापुआ न्यू गिनीपर्यंत तो पोहोचला. आजही भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळसह अनेक शेजारील देशांमध्ये मुद्रेला 'रुपया' याच नावाने संबोधले जाते.
advertisement
कागदी रुपयाची सुरुवात
कागदी रुपयाची सुरुवात 18 व्या शतकात बँक ऑफ हिंदुस्तान नावाच्या एका खासगी बँकेने केली. वचनपत्र (Promissory Note) म्हणून पहिली 1 रुपयाची नोट 1917 मध्ये जारी करण्यात आली होती.
या प्रदर्शनात शेरशाह सूरी आणि मुघल बादशाह अकबर यांच्या चांदीच्या नाण्यांपासून ते आज आपल्या हातात असलेल्या कागदी नोटांपर्यंत 'रुपया'चा संपूर्ण आणि रंजक प्रवास दाखवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Currency : 'बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया'; भारतीय चलन हे रुपया असणार हे कोणी ठरवलं? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement