YouTube वर 2 लाख व्ह्यूज मिळाले तर किती पैसे मिळतात? 10 हजार की 40 हजार? जाणून घ्या कमाईचं 'हे' गणित
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पूर्वी 'नोकरी' म्हणजे फक्त ऑफिसला जाणं असायचं, पण आता 'कंटेंट क्रिएटर' (Content Creator) हा एक पूर्णवेळ व्यवसाय झाला आहे. जर तुमच्याकडे कोणतीही कला असेल किंवा तुम्ही चांगली माहिती देऊ शकत असाल, तर यूट्यूब तुमच्यासाठी सोन्याची खाण ठरू शकतं.
मुंबई : आजच्या काळात हातामध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेट असेल, तर कोणीही रिकामं बसत नाही. आपण तासन् तास यूट्यूबवर (YouTube) व्हिडिओ पाहतो. पण व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या मनात कधी हा विचार आला आहे का की, हे व्हिडिओ बनवणारे लोक नेमके किती पैसे कमवत असतील? अनेकजण म्हणतात की यूट्यूबवरून लाखो रुपये कमवता येतात, पण हे नेमकं होतं कसं?
पूर्वी 'नोकरी' म्हणजे फक्त ऑफिसला जाणं असायचं, पण आता 'कंटेंट क्रिएटर' (Content Creator) हा एक पूर्णवेळ व्यवसाय झाला आहे. जर तुमच्याकडे कोणतीही कला असेल किंवा तुम्ही चांगली माहिती देऊ शकत असाल, तर यूट्यूब तुमच्यासाठी सोन्याची खाण ठरू शकतं. पण, केवळ व्हिडिओ टाकून पैसे मिळत नाहीत; त्यामागे व्ह्यूज, जाहिराती आणि यूट्यूबची एक खास सिस्टीम काम करते. आज आपण यूट्यूबच्या कमाईचं असं गुपित उलगडणार आहोत.
advertisement
यूट्यूब पैसे वाटतं तरी कसं? (Revenue Sharing Model)
यूट्यूबने 2007 मध्ये क्रिएटर्सना पैसे देण्यास सुरुवात केली. गेल्या 20 वर्षांपासून त्यांचं हे मॉडेल इतकं यशस्वी आहे की, दुसरी कोणतीही कंपनी आजवर त्यांच्याशी स्पर्धा करू शकलेली नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, जाहिरातदार यूट्यूबला जाहिरातीसाठी पैसे देतात. या एकूण कमाईपैकी 55 टक्के हिस्सा यूट्यूब क्रिएटर्सना देतं आणि उरलेले 45 टक्के स्वतःच्या खर्चासाठी ठेवतं.
advertisement
कमाई सुरू करण्यासाठी 'हे' आहे पहिलं पाऊल
यूट्यूबवरून पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला YouTube Partner Program (YPP) चा भाग व्हावं लागतं. यासाठी तुमचे दोन निकष पूर्ण असणं गरजेचं आहे
1. तुमच्या चॅनेलवर किमान 1,000 सब्सक्राइबर्स हवेत.
2. गेल्या एका वर्षात तुमच्या व्हिडिओंचा 4,000 तासांचा वॉचटाइम पूर्ण झालेला असावा.
CPM आणि RPM म्हणजे काय?
यूट्यूबच्या भाषेत या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत.
advertisement
CPM (Cost Per Mille) : जाहिरातदार 1,000 जाहिरातींच्या व्ह्यूजसाठी यूट्यूबला जे पैसे देतात, त्याला CPM म्हणतात. भारतात हा दर साधारण 20 ते 150 रुपयांच्या दरम्यान असतो.
RPM (Revenue Per Mille): यूट्यूबने स्वतःचा हिस्सा कापून घेतल्यानंतर 1,000 व्ह्यूजमागे क्रिएटर्सच्या हातात जो पैसा पडतो, त्याला RPM म्हणतात.
व्ह्यूजचं गणित: 2 लाख व्ह्यूजवर किती कमाई?
यूट्यूबवरची कमाई ही तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी (उदा. टेक, कॉमेडी, एज्युकेशन) आणि तुमचे व्हिडिओ कुठे पाहिले जातात (भारत की परदेश) यावर अवलंबून असते. 2026 च्या अंदाजानुसार, यूट्यूब सध्या 1,000 व्ह्यूजसाठी 50 ते 200 रुपयांपर्यंत पैसे देत आहे.
advertisement
या हिशोबाने जर तुमच्या एका व्हिडिओला 2 लाख (2,00,000) व्ह्यूज मिळाले, तर तुम्ही 10,000 ते 40,000 रुपयांपर्यंत कमाई करू शकता. जर तुमचं चॅनेल फायनान्स किंवा टेक संबंधित असेल, तर ही कमाई 40 हजारांच्याही पुढे जाऊ शकते.
कमाईवर परिणाम करणारे घटक
व्हिडिओ फॉरमॅट
शॉर्ट्स (Shorts) पेक्षा मोठ्या व्हिडिओंवर जाहिराती जास्त येतात, त्यामुळे तिथे कमाई जास्त होते.
advertisement
लोकेशन
जर तुमचे व्हिडिओ अमेरिका किंवा युरोपमध्ये पाहिले जात असतील, तर तुम्हाला भारतीय प्रेक्षकांच्या तुलनेत 5 ते 10 पट जास्त पैसे मिळू शकतात.
तुमची ऑडियन्स कोणत्या वयोगटातील आहे, यावरही जाहिरातींचे दर ठरतात.
यूट्यूबवरून लाखो रुपये कमवणं शक्य आहे, पण त्यासाठी सातत्य आणि चांगल्या कंटेंटची गरज आहे. 2 लाख व्ह्यूजवर मिळणारी 40 हजारांची रक्कम ही सुरुवातीसाठी खूप मोठी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे काही सांगण्यासारखं असेल, तर कॅमेरा उचला आणि सुरू करा; कारण तुमची एक 'क्लिक' तुमचं आयुष्य बदलू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 7:35 PM IST
मराठी बातम्या/मनी/
YouTube वर 2 लाख व्ह्यूज मिळाले तर किती पैसे मिळतात? 10 हजार की 40 हजार? जाणून घ्या कमाईचं 'हे' गणित









