Income Tax Slabs 2024-25: तुमचा पगार 30 हजार असेल तर तुम्हाला किती Tax द्यावा लागेल?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Income Tax Slabs 2024-25: जर तुमचा पगार 30 हजार रुपये असेल तर तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल?
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या. सर्वसामान्य लोकांच्या आणि नोकरदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलेल्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. यावेळी बजेटमध्ये टॅक्सबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होणार का हे समजून घेणार आहोत.
जर तुमचा पगार 30 हजार रुपये असेल तर तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टॅक्स बसत असो नसो तुम्ही Null ITR फाइल करणंही गरजेचं आहे. तुमच्या हातात पगाराची रक्कम 30 हजार किंवा त्यापेक्षा जास्त येत असेल तर म्हणजे साधारण वर्षाला तुमच्या हातात 3, 60,000 येत असतील तर तुम्हाला कर भरावा लागणार का? तुम्ही कोणतं रीजीम निवडायचं, नवीन निवडता की जुनं यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आपण दोन्ही रीजीमनुसार समजून घेऊया.
advertisement
नव्या करप्रणालीनुसार जर तुम्हाला वर्षाचे 3,60,000 रुपये हातात किंवा खात्यावर येत असतील तर तुम्हाला 3-7 लाख रुपयांपर्यंत 5 टक्के कर भरावा लागणार आहे. त्यातही आधी ५० हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन होतं, ते वाढवून 75 हजार रुपये करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला ७५ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. नव्या करप्रणालीमध्ये तुम्हाला फक्त NPS चा लाभ घेता येणार आहे. बाकी PPF किंवा इतर कोणत्याही सुविधांचा लाभ घेता येणार नाही.
advertisement
तर जुन्या करप्रणालीनुसार तुम्ही टॅक्स भरत असाल तर 3,6000 रुपयांसाठी तुम्हाला 5 टक्के कर द्यावा लागेल. 50 हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन आणि त्याशिवाय NPS, हेल्थ इंश्युरन्स आणि काही पॉलिसी, अथवा PPF, सुकन्या समृद्धी सारख्या योजनांमध्ये तुम्हाला पैसे गुंतवता येणार आहेत. त्यामुळे तुमचा कर वाचेल.
advertisement
३ लाख ६० हजारवर तुम्हाला 50 हजार स्टँण्डर्ड डिडक्शन पकडलं तरी तुम्ही टॅक्सस्लॅबमध्ये बसत नाही. त्यामुळे तुम्हाला शून्य रुपये टॅक्स बसेल. मात्र तुम्ही जर नवीन करप्रणाली निवडली असेल तर तुम्हाला 3-7 लाखापर्यंत 5 टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2024 1:18 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Income Tax Slabs 2024-25: तुमचा पगार 30 हजार असेल तर तुम्हाला किती Tax द्यावा लागेल?