5 लाख किंवा 7 लाख पॅकेज असणाऱ्या नोकरदारांना किती द्यावा लागणार टॅक्स? संपूर्ण माहिती
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नवीन कर प्रणालीनुसार आता 5 -10 लाख पॅकेज असणाऱ्या नोकरदार वर्गाला वर्षाला किती इनकम टॅक्स भरावा लागणार आहे? पाहूयात.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या 9 प्राधान्यांमध्ये उत्पादकता, नोकऱ्या, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नोकरदार वर्गाचं लक्ष असतं ते म्हणजे इनटम टॅक्सकडे. यंदाच्या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स संदर्भातील नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
नोकरदार कर्मचाऱ्यांच्या स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 रुपयांवरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. नवीन कर प्रणालीनुसार आता 5 -10 लाख पॅकेज असणाऱ्या नोकरदार वर्गाला वर्षाला किती इनकम टॅक्स भरावा लागणार आहे? पाहूयात.
नवीन कर प्रणालीनुसार,
0-3 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला कर भरावा लागणार नाही.
advertisement
3-7 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 5% कर भरावा लागणार आहे.
7-10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 10% कर भरावा लागणार आहे.
10-12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 15% कर भरावा लागणार आहे.
12-15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 20% कर भरावा लागणार आहे.
advertisement
15 लाख आणि त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 30% कर भरावा लागणार आहे.
पेन्शनधारकांसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील कपात 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2024 12:58 PM IST
मराठी बातम्या/मनी/
5 लाख किंवा 7 लाख पॅकेज असणाऱ्या नोकरदारांना किती द्यावा लागणार टॅक्स? संपूर्ण माहिती