Share Market Crash: शेअर बाजारात ‘ब्लडबाथ’, धडकी भरवणारी घसरण; गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा चुराडा, पुढे काय होणार?

Last Updated:

Share Market: भारतीय शेअर बाजारात आज भीषण पडझड झाली. सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी कोसळल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

News18
News18
मुंबई: भारतीय शेअर बाजारात आज 26 सप्टेंबर रोजी सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स तब्बल 800 अंकांनी कोसळला. तर निफ्टी घसरून 24,650 च्या खाली पोहोचला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ घोषणेमुळे आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढासळला आहे. याशिवाय आयटी शेअर्समध्ये झालेली विक्री आणि जागतिक बाजारातून मिळालेले संकेत यांनीही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम केला. बीएसई मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्स व्यवहारादरम्यान 1.5 टक्क्यांपर्यंत कोसळले.
advertisement
दुपारी 2:28 वाजता बीएसई सेन्सेक्स 776.96 अंक म्हणजेच 0.96% घसरून 80,382.72 या पातळीवर होता. तर निफ्टी 243.60 अंक म्हणजेच 0.98% पडून 24,647.25 वर होता.
आजच्या घसरणीमागे चार मोठ्या कारणांचा हात आहे
1. डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन टॅरिफ घोषणा
आजच्या बाजारातील घसरणीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नवी टॅरिफ घोषणा मोठे कारण ठरली. ट्रम्प यांनी ब्रँडेड आणि पेटंटेड औषधांच्या इम्पोर्टवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. याशिवाय किचन कॅबिनेट्स आणि बाथरूम व्हॅनिटीजवर 50%, गाद्यांवर 30% आणि जड ट्रकांवर 25% टॅरिफ लावले जाणार आहे. हे नवे टॅरिफ 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.
advertisement
या घोषणेमुळे भारतीय फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. निफ्टी फार्मा इंडेक्स सकाळी 2.3% ने खाली आला. इंडेक्समधील सर्व 20 शेअर्स लाल निशाणावर होते. सन फार्माचे शेअर्स 3.4% घसरले. डॉ. रेड्डीज आणि सिप्ला यांचे शेअर्स 2-3% पडले. नैटको फार्मा, लॉरेस लॅब्स आणि बायोकॉन यांचे शेअर्स 3-5% पर्यंत कोसळले.
advertisement
किचन कॅबिनेट्सवर टॅरिफ लागू झाल्याने कैरीसिल लिमिटेडच्या शेअर्समध्ये 8% घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते भारताच्या फार्मा निर्यातीपैकी सुमारे 25% हिस्सा अमेरिकेकडे जातो. जेनरिक औषधे मात्र सध्या टॅरिफच्या बाहेर ठेवली आहेत. परंतु ही सूट किती दिवस टिकेल हे ट्रम्प यांच्या धोरणांवर अवलंबून असेल.
advertisement
2. अॅक्सेंचरच्या निकालांमुळे आयटी शेअर्समध्ये घसरण
भारतीय आयटी शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी घसरण दिसून आली. निफ्टी आयटी इंडेक्स 1.3% ने घसरला आणि सर्व 10 आयटी शेअर्स लाल निशाणावर गेले. यामागे अमेरिकन टेक कंपनी अॅक्सेंचर (Accenture) च्या तिमाही निकालांचा परिणाम दिसून आला. या निकालांमुळे आयटी क्षेत्रातील डिमांड रिकव्हरीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.
advertisement
ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीच्या मते सध्या मागणीतली सुधारणा अपुरी आणि असमान आहे. जेफरीजने इशारा दिला की या कमकुवत ग्रोथ गाईडन्समुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या वाढीचे अंदाजही खाली येऊ शकतात.
तसेच H-1B व्हिसा फीमध्ये वाढ झाल्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांचा खर्च आणखी वाढेल अशी चिंता आहे. याशिवाय अमेरिकन खासदार आता Amazon आणि Apple सारख्या दिग्गज कंपन्यांच्या H-1B व्हिसा वापराबाबत चौकशीची मागणी करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा संभ्रम अधिक वाढला.
advertisement
3. कमकुवत जागतिक संकेत
ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर आशियाई शेअर बाजारातही घसरण झाली. जपानचा निक्केई इंडेक्स 0.13% ने घसरला. हँग सेंग इंडेक्स 0.9% पडला. चीनचा CSI300 इंडेक्स 0.3% घसरला आणि MSCI चा आशिया-पॅसिफिक (जपान वगळून) इंडेक्स 1% पेक्षा जास्त पडला. अमेरिकन बाजारसुद्धा गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी घसरणीसह बंद झाले.
4. परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री
परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव कायम आहे. गुरुवारी (25 सप्टेंबर) परदेशी गुंतवणूकदारांनी 4,995 कोटी रुपयांची विक्री केली. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत त्यांनी भारतीय बाजारातून तब्बल 24,454 कोटी रुपयांची माघार घेतली आहे.
ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते- परदेशी गुंतवणूकदारांसाठी कंपन्यांची कमाईतील वाढ हीच सर्वात मोठी चिंता आहे.
मराठी बातम्या/मनी/
Share Market Crash: शेअर बाजारात ‘ब्लडबाथ’, धडकी भरवणारी घसरण; गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा चुराडा, पुढे काय होणार?
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement