advertisement

रेडीमेड कपड्यांच्या जमान्यात टेलरिंग व्यावसायिकांचे बुरे दिन, कोणत्या अडचणींचा करावा लागतोय सामना?

Last Updated:

पारंपारिक पद्धतीने कपडे शिवून उदरनिर्वाह करणाऱ्या टेलर व्यवसायिकांना सध्या वाईट दिवस आले आहेत. पारंपारिक टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे लोकल 18 ने जाणून घेतलं पाहुयात.

+
कापड

कापड शिवणारे टेलर व्यवसायिक

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : हल्ली कपड्यांची शॉपिंग म्हटलं की रेडीमेड कपडे हेच चित्र डोळ्यासमोर उभे राहत. मात्र 15 ते 20 वर्षांपूर्वी दुकानातून कापड घेऊन ते शिंप्याकडून शिवून घेणे हाच नवीन कपडे घेण्याचा अर्थ होता. बदलत्या वातावरणाबरोबर शिंप्याकडून कपडे शिवून परिधान करणे कमी होत गेले आणि रेडिमेड फॅशनेबल कपड्यांचा ट्रेंड वाढीस लागला. यामुळे रेडीमेड कपड्यांची विक्री करणारे विक्रेते गब्बर झाले. मात्र पारंपारिक पद्धतीने कपडे शिवून उदरनिर्वाह करणाऱ्या टेलर व्यवसायिकांना सध्या वाईट दिवस आले आहेत. पारंपारिक टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे लोकल 18 ने जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
जालना जिल्ह्यातील रामनगर येथील टेलर व्यावसायिक कोंडीबा निकम हे मागील वीस वर्षांपासून कपडे शिवण्याच्या व्यवसायात आहेत. 60 रुपये प्रति ड्रेसची शिलाई याप्रमाणे त्यांनी कामाला सुरुवात केली. सध्या एका ड्रेसची शिलाई 500 रुपयांपर्यंत आहे. मात्र 20 वर्षांपूर्वी दररोज 15 -20 लोक कपडे शिवण्यासाठी मोजमाप देण्यासाठी येत.
advertisement
आता एका दिवसात केवळ एक ते दोन ग्राहक येतात. वेगवेगळ्या ऑफर आणि आकर्षक जाहिराती याला ग्राहक वर्ग भुलत असून अत्यंत कमी किंमतीमध्ये कपडे मिळत असल्याने सर्वसामान्यांचा कल हा रेडिमेड कपडे घेण्याकडेच वाढला आहे. याचाच व्यवसायावर परिणाम होत असून आगामी काळात आम्हाला दुसरा व्यवसाय शोधायची वेळ येणार असल्याचं कोंडीबा निकम या व्यावसायिकाने सांगितलं.
advertisement
सध्या सगळा तरुण वर्ग रेडिमेड कपड्यांकडे आकर्षित झाला आहे. त्यामुळे दुकानातून कापड विकत घेऊन ते टेलरकडे जाऊन शिवून घेण्याकडे तरुणांचा कल फारच कमी आहे. सध्या आमच्याकडे केवळ पन्नाशी पार केलेले लोकच कपडे शिवून घेण्यासाठी येतात. नवीन पिढीतील एकही तरुण शिवून कपडे घेण्यास तयार नसतो.
advertisement
दररोज दहा ते पंधरा ड्रेस आधी शिवायला यायचे आता एक ते दोन ग्राहक कपडे घेऊन येतात. यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील कठीण झाला आहे भविष्य काळामध्ये तर हा व्यवसाय बंद पडतो की काय अशी चिंता आम्हाला सतावत आहे. पूर्वीचे दिवस खूप चांगले होते गेले ते दिवस आणि आता राहिल्या त्या केवळ आठवणी, अशी भावनिक प्रतिक्रिया कोंडीबा निकम व्यक्त करतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
रेडीमेड कपड्यांच्या जमान्यात टेलरिंग व्यावसायिकांचे बुरे दिन, कोणत्या अडचणींचा करावा लागतोय सामना?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement