advertisement

EPFO: तुमच्या PF बॅलन्सबद्दल मोठी बातमी, नवी सोपी सुविधा सुरू; इंटरनेटशिवायही करता येईल काम

Last Updated:

EPFO Big News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही इंटरनेटशिवाय केवळ एका मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे तुमच्या PF खात्यातील शिल्लक आणि शेवटच्या योगदानाची माहिती सहजपणे मिळवू शकता.

News18
News18
मुंबई: भारतातील कोट्यवधी पगारदार लोकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही त्यांच्या निवृत्तीच्या बचतीचा एक महत्त्वाचा भाग असतो. तुमचा नियोक्ता तुमच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये नियमितपणे योगदान देत असला तरी अनेक ग्राहकांना त्यांच्या EPF बॅलन्स (PF Balance) आणि शेवटच्या योगदानाच्या तपशीलाची तपासणी करणे किती सोपे आहे याची माहिती नसते. आता तुम्ही इंटरनेटशिवाय केवळ कॉल आणि एसएमएसच्या माध्यमातून तुमच्या पीएफ बॅलन्सची माहिती मिळवू शकता. जाणून घ्या त्याची सोपी प्रक्रिया:
मिस्ड कॉलद्वारे EPF बॅलन्स कसा तपासायचा (How To Check EPF Balance Through a Missed Call):
पायरी 1: तुमच्या UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) शी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.
पायरी 2: दोन रिंग झाल्यावर कॉल आपोआप कट होईल आणि यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.
advertisement
पायरी 3: काही वेळातच तुम्हाला एक SMS प्राप्त होईल. ज्यामध्ये तुमच्या मागील EPF योगदानाची आणि तुमच्या सध्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या बॅलन्सची माहिती दिलेली असेल.
ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि 24x7 उपलब्ध आहे.
SMS द्वारे EPF बॅलन्स कसा तपासायचा (How to Check EPF Balance Through SMS):
advertisement
EPFO एसएमएस-आधारित सुविधा देखील पुरवते. ज्यामुळे तुम्ही काही सेकंदात तुमच्या खात्याचा तपशील पाहू शकता.
पायरी 1: तुमच्या फोनमधील SMS मध्ये जा.
पायरी 2: खालील फॉरमॅटमध्ये मेसेज लिहा: EPFOHO UAN
पायरी 3: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून हा मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
डीफॉल्टनुसार तुम्हाला इंग्रजीमध्ये उत्तर मिळेल. तथापि EPFO अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करते. तुमच्या आवडीच्या भाषेत संदेश मिळवण्यासाठी संदेशाच्या शेवटी त्या भाषेच्या नावाचे पहिले तीन अक्षरे जोडा.
advertisement
उदाहरणार्थ: मराठीमध्ये संदेश मिळवण्यासाठी टाइप करा: EPFOHO UAN MAR
view comments
मराठी बातम्या/मनी/
EPFO: तुमच्या PF बॅलन्सबद्दल मोठी बातमी, नवी सोपी सुविधा सुरू; इंटरनेटशिवायही करता येईल काम
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement