M S Dhoni : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समुळे LIC चं चांगभलं, 1000 कोटींचा झाला फायदा?

Last Updated:

LIC CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या यशामुळे भारतीय जीवन विमा महामंडळाला 1000 कोटींचा नफा झाला आहे. सीएसकेच्या शेअर्सची किंमत वाढल्याने एलआयसीला मोठा फायदा झाला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्सचे वर्चस्व दिसून आले आहे. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेने 12 वेळेस प्लेऑफ आणि 10 वेळेस अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, 5 वेळेस विजेतेपद पटकावले आहे. सीएसकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेने केवळ क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले नाही तर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय जीवन विमा महामंडळावरही पैशांचा पाऊस पाडला आहे. चेन्नई सुपर किंग्समुळे एलआयसीला 1000 कोटींचा नफा झाला आहे.

एलआयसीचा नफा कसा झाला?

2008 मध्ये, चेन्नई सुपर किंग्सची मालकी इंडिया सिमेंट्सने विकत घेतली. एलआयसीकडे इंडिया सिमेंट्सचे 1.8 कोटी शेअर्स होते. त्यामुळे, एलआयसी देखील चेन्नई सुपर किंग्समध्ये भागधारक बनली. 2014 मध्ये, आयपीएलने एक नवीन नियम लागू केला. त्यानुसार, फ्रँचायझी स्वतंत्र कंपन्या असतील. यानंतर, सीएसकेचे चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेड नावाच्या स्वतंत्र संस्थेत रूपांतर झाले. या बदलामुळे, एलआयसीला चेन्नई सुपर किंग्जमध्ये 6.04 टक्के हिस्सा मिळाला.
advertisement
सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडच्या अनलिस्टेड शेअर्सची किंमत प्रति शेअर 31 रुपये होती. 2024 पर्यंत त्यांची किंमत 190-195 रुपयांपर्यंत पोहोचली. 2024 मध्ये एकेकाळी सीएसकेचा शेअर 223 रुपयांपर्यंत पोहोचला. अशाप्रकारे, एलआयसीला सीएसकेमधील गुंतवणुकीवर ६ पट पर्यंत मोठा नफा मिळाला.

चेन्नई सुपर किंग्सच्या शेअरचा दर का वाढला?

चेन्नई सुपर किंग्सच्या शानदार कामगिरीमुळे एलआयसीला एवढा बंपर फायदा झाला आहे. मागील काही वर्षात चेन्नई सुपर किंग्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. चांगला नफा कमावण्यासोबत आपल्या ब्राँडचे मूल्य देखील वाढवण्यात यश मिळवले. आर्थिक वर्ष 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे सेंट्रल पूल इनकममधून (ब्रॉडकास्टिंग आणि स्पॉन्सरशिप) 150 टक्क्यांनी वाढून 479 कोटी रुपये झाली. अशा प्रकारे आर्थिक वर्ष 23 मध्ये 14 कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 24 मध्ये करपश्चात नफा (PAT) 201 कोटी रुपयांपर्यंत वाढला. ही 1365 टक्के इतकी मोठी वाढ आहे.
advertisement
आयपीएलचे मीडिया राइट्स हे तीन पट अधिक रक्कमेने विकण्यात आले आहेत. या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली. धोनीच्या करिष्म्यामुळे चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सीएसकेची मैदानावरील कामगिरी आणि चाहत्यांचा वाढता प्रतिसाद यामुळे मुथुट ग्रुपसारख्या ब्रॅण्डसने सीएसकेला स्पॉन्सरशिप दिली आहे.
मराठी बातम्या/मनी/
M S Dhoni : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समुळे LIC चं चांगभलं, 1000 कोटींचा झाला फायदा?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement