Schemes for Womens : महिलांसाठी भन्नाट योजना, दरमहा 7000 रुपये कमावण्याची संधी, कसा करता येईल अर्ज?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Schemes for Womens : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत.
मुंबई: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सरकारकडून विविध योजना सुरू आहेत. यामध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. महिलांना आता दरमहा 7 हजार रुपये कमावण्याची संधी मिळणार आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत.
आयुर्विमा महामंडळाने (LIC) महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. महिला करिअर एजंट (MCA) योजनेअंतर्गत, महिला आता 'विमा सखी' बनून या क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतात. या अंतर्गत, त्या सुरुवातीला दरमहा 7000 रुपयांपर्यंत कमवू शकतात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी हा उपक्रम एक मोठे पाऊल आहे.
>> विमा सखीसाठी निकष काय?
advertisement
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 70 वर्षे असावे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता 10 वी पास ठेवण्यात आली आहे. लक्षात ठेवा की ही LIC मध्ये कायमस्वरूपी नोकरी नाही, तर स्टायपेंड-आधारित एजंटशिप संधी आहे.
>> तुम्हाला किती पैसे मिळतील?
एमसीए योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिलांना खालीलप्रमाणे स्टायपेंड मिळेल:
advertisement
पहिल्या वर्षी: दरमहा 7000 रुपये
दुसरे वर्ष: दरमहा 6000 रुपये (पहिल्या वर्षी विकल्या गेलेल्या 65 टक्के पॉलिसी सक्रिय राहिल्यास)
तिसरे वर्ष: दरमहा 5000 रुपये (दुसऱ्या वर्षाच्या अटींप्रमाणेच)
दरवर्षी स्टायपेंड मिळविण्यासाठी, महिला एजंटला किमान 24 नवीन पॉलिसी विकायच्या आहेत आणि पहिल्या वर्षी 48,000 रुपयांपर्यंत कमिशन (बोनस वगळून) मिळवावे लागेल.
>> कोण अर्ज करू शकत नाही?
advertisement
विद्यमान एलआयसी एजंट
एलआयसी कर्मचारी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक (पती/पत्नी, मुले, पालक, भावंडे, सासू-सासरे इ.)
निवृत्त एलआयसी कर्मचारी
पुनर्नियुक्ती मिळवू इच्छिणारे माजी एजंट
>> अर्ज कसा करावा?
इच्छुक महिलांनी अर्ज करताना खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा:
वयाचा पुरावा
पत्त्याचा पुरावा
शैक्षणिक प्रमाणपत्र
इच्छुकाचा अपूर्ण अर्ज नाकारला जाऊ शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 03, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Schemes for Womens : महिलांसाठी भन्नाट योजना, दरमहा 7000 रुपये कमावण्याची संधी, कसा करता येईल अर्ज?


