लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स वाढला; Mutual Fund विकल्यानंतर आता किती कर द्यावा लागणार?
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात इक्विटी म्युच्युअल फंड्ससाठी लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीम्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का बसला आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात इक्विटी म्युच्युअल फंड्ससाठी लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीम्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का बसला आहे. त्याचा गुंतवणुकीवर कसा परिणाम होईल, कररूपाने आकारल्या जाणाऱ्या रकमेत किती वाढ होईल, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या.
किती वाढवण्यात आला आहे टॅक्स?
लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के करण्यात आला आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर नेण्यात आलं आहे. एक वर्षानंतर विक्रीनंतर झालेल्या गेन्सवर लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आकारला जातो. एक वर्षापेक्षा कमी कालावधीत केलेल्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आकारला जातो. आधी एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपर्यंतच्या लाँग टर्म कॅपिटल गेन्सला करसवलत होती. आता ती मर्यादा वाढवून 1.25 लाख करण्यात आली आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स वाढल्यामुळे आता टॅक्स जास्त लागेल. इक्विटी फंडमध्ये प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपयांची एसआयपी पाच वर्षांनंतर विकल्यानंतर आता 94,095 रुपये लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागेल. टॅक्स वाढला नसता, तर 77,456 रुपये टॅक्स भरावा लागला असता.
advertisement
एसआयपी गुंतवणुकीवर परिणाम
एसआयपीच्या माध्यमातून इक्विटी फंडमध्ये होणारी प्रत्येक गुंतवणूक कराच्या अनुषंगाने एक वेगळी गुंतवणूक मानली जाते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती एसआयपीमधून इक्विटी फंडमध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवणूक करत असेल, तर ही गुंतवणूक होल्डिंग पीरियड आणि टॅक्स रेटच्या अनुषंगाने एक वेगळी गुंतवणूक मानली जाईल. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की टॅक्सच्या अनुषंगाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास FIFO सिद्धांत लागू होतो. याचा अर्थ फर्स्ट इन फर्स्ट आउट.
advertisement
1.25 लाखांपेक्षा लाँग टर्म कॅपिटल गेन्सवर टॅक्स
लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 10 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर नेल्यामुळे गुंतवणूकदारांना अधिक टॅक्स भरावा लागेल; मात्र एक्झम्पशन लिमिट एक लाखांवरून सव्वा लाखावर नेण्यात आलं आहे. अर्थमंत्र्यांनी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्सदेखील 15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर नेला आहे. म्हणजे एका वर्षाआधी इक्विटी म्युच्युअल फंडाची युनिट्स विकली, तर 20 टक्के कर भरावा लागेल.
advertisement
यात कमी कर
गोल्ड फंड किंवा गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड, ओव्हरसीज फंड आणि फंड्स ऑफ फंड्सवर कॅपिटल गेन्स टॅक्स घटवण्यात आला आहे. डेट म्युच्युअल फंडाच्या टॅक्सच्या नियमांत बदल करण्यात आलेला नाही. त्यावर नॉर्मल इन्कम टॅक्स रेटच्या हिशेबाने टॅक्स लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 24, 2024 11:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/
लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स वाढला; Mutual Fund विकल्यानंतर आता किती कर द्यावा लागणार?