Stock Tips : पैसे गुंतवण्याआधी विचार करा, 61% प्रॉफिटनंतर मोठा धक्का; Share 7% कोसळणार, मोतीलाल ओसवालचा स्फोटक अंदाज

Last Updated:

Share Market Prediction: एनएसडीएल शेअरने आयपीओनंतर गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला असला तरी आता घसरणीचा धोका वाढला आहे. मोतीलाल ओसवाल यांनी Neutral रेटिंग देत पुढील काळात 7% घसरणीचा अंदाज वर्तवला आहे.

News18
News18
मुंबई : मागील महिन्यात शेअर बाजारात दमदार एन्ट्री करणाऱ्या एनएसडीएल (NSDL) शेअरमध्ये अजूनही आयपीओ प्राइसपेक्षा सुमारे 61 टक्के वाढ दिसत आहे. परंतु ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आता या शेअरमध्ये पुढे घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कंपनीने या शेअरला ‘न्यूट्रल’ रेटिंग दिली आहे. बुधवारी एनएसडीएल शेअर घसरणीसह बंद झाला होता. तर आज (गुरुवार) हा शेअर हलक्या तेजीने सुमारे 1290 रुपयांवर व्यवहार करत आहे.
advertisement
शेअरची कामगिरी
एनएसडीएलने 6 ऑगस्ट 2025 रोजी शेअर बाजारात पदार्पण केले. आयपीओसाठी अपर प्राइस बँड 800 रुपये प्रति शेअर होता. तर शेअर 10 टक्क्यांनी वाढून 880 रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसून आली. 11 ऑगस्ट रोजी शेअरने 1,425 रुपयांचा स्तर गाठून 52 आठवड्यांचा उच्चांक नोंदवला.
टारगेट प्राइस
advertisement
मोतीलाल ओसवाल यांच्या मते, एनएसडीएल मजबूत फंडामेंटल्स असलेल्या क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र सध्याच्या भावामध्ये बहुतांश सकारात्मक घटकांचा प्रभाव आधीच समाविष्ट झाला आहे. त्यामुळे निकट भविष्यात ते मध्यम कालावधीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता मर्यादित आहे.
त्यांच्या अंदाजानुसार वित्त वर्ष 2025-28 दरम्यान कंपनीचा महसूल 5 टक्के, EBITDA 14 टक्के आणि शुद्ध नफा (PAT) 15 टक्क्यांनी वाढेल. एनएसडीएलला चांगल्या प्राइसिंग पॉवरचा आणि हाय-वॅल्यू अकाउंट्समधील मजबूत उपस्थितीचा फायदा होतो.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी अंदाज
ब्रोकरेज हाऊसने एनएसडीएल शेअरवर न्यूट्रल रेटिंग कायम ठेवली आहे. तसेच पुढील एका वर्षासाठी टारगेट प्राइस 1,200 रुपये निश्चित केला आहे. याचा अर्थ सध्याच्या भावापासून सुमारे 7 टक्क्यांची घसरण दिसू शकते.
मोतीलाल ओसवाल यांनी नमूद केले की- एनएसडीएल ही देशातील पहिली डिपॉझिटरी आहे आणि सध्या भारतात फक्त दोनच डिपॉझिटरीज आहेत. त्यामुळे कंपनीला बाजारातील संरचनात्मक बदलांचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. याशिवाय किरकोळ गुंतवणूकदारांची वाढती भागीदारी, संस्थात्मक व कॉर्पोरेट अकाउंट्समधून वाढणारी कस्टडी व्हॅल्यू या दोन्हीमुळे कंपनीच्या व्यवसायाला पाठबळ मिळेल.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Stock Tips : पैसे गुंतवण्याआधी विचार करा, 61% प्रॉफिटनंतर मोठा धक्का; Share 7% कोसळणार, मोतीलाल ओसवालचा स्फोटक अंदाज
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement