advertisement

तुम्हाला फसवून तुमच्या पॅनकार्डवर कुणी कर्ज घेतलंय का? कसं करायचं चेक

Last Updated:

तुमच्या पॅनकार्ड तुम्हाला फसवून कुणी कर्ज घेतलंय का? कसं करायचं चेक

पॅन कार्ड
पॅन कार्ड
Pan Card Scam: आजकाल डिजिटल फसवणुकीचं प्रमाण वाढलं आहे. तुमचं आधार कार्ड, सिमकार्ड, पॅन कार्ड याचा कुठेही कसाही गैरवापर होऊ शकतो. तुम्हाला फसवून तुमच्या पॅनकार्ड कुणी कर्ज घेतलंय की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. एखाद्याच्या पॅन कार्डचा तपशील वापरून त्यांच्या नावावर बनावट कर्ज घेतात. पॅन कार्ड तुमच्या क्रेडिट रिपोर्टशी जोडलेले असतं कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलं आणि ते भरलं नाही तर त्याचा परिणाम थेट क्रेडिट स्कोअरवर केला आहे.
कसं चेक करायचं?
तुमच्या नावाच्या पॅनकार्डवर कुणी कर्ज घेतलं की नाही त्याचा कोणी गैरवापर केला का ते तुम्ही तपासू शकता. तुमची फसवणूक टाळण्यासाठी ते वेळोवेळी तपासून पाहाणं गरजेचं आहे. तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावावर कोणतेही कर्ज घेतले आहे का, हे तपासण्याचा पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहा. सिबिल, एक्सपेरियन आणि इक्विफॅक्स यांसारख्या क्रेडिट ब्युरोमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व सक्रिय आणि जुन्या क्रेडिट व्यवहारांची सविस्तर माहिती मिळते.
advertisement
तर अडचणी निर्माण होऊ शकते
जर तुमच्या नावावर कोणतेही कर्ज नसले तरी याचा अर्थ असा नाही की तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झालेला नाही. तुमच्या खात्यावर झालेल्या चौकश्यांची संख्या तपासा. जर तुम्हाला काही संशयास्पद तपशील दिसले, तर त्यांची माहिती क्रेडिट ब्युरोला त्वरित द्या, तुमच्या पॅनकार्डचा कोणी गैरवापर करत असेल तर तुम्ही अडचणी येण्याची शक्यता असते.
advertisement
तुमच्या नावावर जर फसवून कर्ज घेतलं असेल तर काय करायचं?
तुमच्या नावावर एखाद्या फसवणूक करणाऱ्याने कर्ज घेतले असेल तर आधी शांत व्हा, चिडचिड करून, डोक्याला ताण देऊन घाईत चुकीचे निर्णय घेऊ शकता.संबंधित Bank Manager सविस्तर तक्रार लिहा आणि त्याची पोचपावती घ्या. बँकेकडे अधिकृतपणे तुमची तक्रार नोंदवा. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करा. या फसवणुकीचे सर्व तपशील, बँकेतील तक्रारीची प्रत आणि पोलीस तक्रारीची प्रत एकत्र करून आरबीआय लोकपालाला ईमेल करा.
advertisement
पॅन कार्डचा गैरवापर कसा टाळावा?
आजकाल बहुतेक व्यावसायिक व्यवहारांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती आवश्यक असते, त्यामुळे तुम्ही नेहमीच सतर्क राहणे आवश्यक आहे. तुमच्या पॅन कार्डची माहिती असुरक्षित वेबसाइट्स, व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स किंवा संशयास्पद विक्रेत्यांना देऊ नका. जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर तात्काळ डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करा आणि पुढील काही महिन्यांसाठी तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासा. तुमच्या आर्थिक खात्यांसाठी पासवर्ड सोपा ठेवू नका. पॅनशी जोडलेल्या कर्ज किंवा क्रेडिट अर्जांसाठी एसएमएस/ईमेल सूचना सुरू ठेवा. ज्याद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुम्हाला फसवून तुमच्या पॅनकार्डवर कुणी कर्ज घेतलंय का? कसं करायचं चेक
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement