Muhurat Trading : मुहूर्त ट्रेंडिगमध्ये प्रॉफिट होतो की लॉस? मागील 10 वर्षांचा असा हा शेअर मार्केटचा रेकॉर्ड
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
सध्या गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगची वाट पाहताहेत. हे ट्रेडिंग 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी होईल.
मुंबई, 11 नोव्हेंबर : सध्याची शेअर मार्केटची स्थिती पाहिल्यास सेन्सेक्स 65 हजारांखाली आहे, तर निफ्टी 19400च्या खाली आहे. सध्या गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगची वाट पाहताहेत. हे ट्रेडिंग 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी होईल. एका तासाच्या या ट्रेडिंगमध्ये अनेक जण स्टॉक खरेदी करतात. मागच्या 10 वर्षांत स्पेशल ट्रेडिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांनी स्पेशल मुहूर्तावर किती कमाई केली.
गुंतवणूकदार 10पैकी 8 वेळा झाले मालामाल
गेल्या 10 वर्षांत शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये 8 वेळा नफा कमावला आहे. या 8 वर्षांत सेन्सेक्स आणि निफ्टीने पॉझिटिव्ह रिटर्न दिले. उर्वरित दोन वर्षी मात्र गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. गेल्या वर्षीची दिवाळी अलीकडच्या वर्षांतली सर्वोत्तम होती, जेव्हा सेन्सेक्स 524.5 अंकांच्या वाढीसह बंद झाला. 2016 आणि 2017मध्ये सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. 2017 साली सेन्सेक्समध्ये 194 अंकांची घसरण झाली होती. 2018 ते 2022 या कालावधीत 5 दिवाळी स्पेशल ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.
advertisement
मास्टरट्रस्टचे एमडी हरजितसिंग अरोरा सांगतात, की दिवाळीत ट्रेडिंगदरम्यान बाजारात खूप चढ-उतार असतात. अशा परिस्थितीत यापैकी कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी पुरेशी लिक्विडिटी असलेले स्टॉक शोधले पाहिजेत.
10 वर्षांतली मुहूर्त ट्रेडिंगमधली सेन्सेक्सची अवस्था
वर्ष सेन्सेक्समध्ये तेजी वा घसरण (अंकांत) रिटर्न (टक्क्यांत)
2013 42.2 0.20
2014 63.8 0.24
advertisement
2015 123.7 0.48
2016 -11.3 -0.04
2017 -194.4 -0.60
2018 245.8 0.70
2019 192.1 0.49
2020 195 0.45
2021 295.7 0.49
2022 524.5 0.88
निवडणुकांपूर्वी 6 महिने बाजारात असते तेजी
सणासुदीच्या काळात दिसणार्या तेजीच्या हंगामाव्यतिरिक्त विश्लेषक असंही सांगत आहेत, की लोकसभा निवडणुकीपूर्वी शेअर मार्केट पॉझिटिव्ह रिटर्न देतो. गेल्या 25 वर्षांत सेन्सेक्सने निवडणुकीआधीच्या सहा महिन्यांत कधीही निगेटीव्ह रिटर्न दिलेला नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये, सॅमको सिक्युरिटीजचे मार्केट पर्स्पेक्टिव्ह प्रमुख अपूर्व शेठ यांनी सांगितलं, की पाच निवडणुकांदरम्यान निकाल जाहीर होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी निफ्टीची सरासरी वाढ 26.4 टक्के झाली आहे. 2009च्या निवडणुकीच्या निकालापूर्वी सर्वाधिक 61.1 टक्के रिटर्न पाहायला मिळाले. 2004च्या निवडणुकीपूर्वी सर्वांत कमी 8.7 टक्के रिटर्न मिळाले होते.
advertisement
दिवाळीत शेअर बाजारात सामान्य व्यवहार दिसणार नाहीत. दिवाळीच्या दिवशी, मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी 6:15 पासून सुरू होईल, जी एक तास चालेल. या दिवशी ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी असतो. मुहूर्त ट्रेडिंग सत्रानंतर शेअर बाजार सहसा तितकासा चांगला नसतो. गेल्या 10 वर्षांचे ट्रेंड असंच काही सांगत आहेत. 10 वर्षांत 6 वेळा विशेष ट्रेडिंग सत्रांनंतर बाजारात घसरण पाहायला मिळाली.
advertisement
जाणकार काय म्हणतात?
याबाबत इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये शेठ सांगतात, की गुंतवणूकदारांच्या वतीने विशेष ट्रेडिंगसाठी दर्जेदार स्टॉक्स खरेदी केले जातात. गुंतवणूकदार हे स्टॉक अनेक महिने त्यांच्याकडे ठेवतात. आपण दुसऱ्या दिवशी जी घसरण किंवा विक्री पाहतो ती सामान्यतः त्या दिवसाच्या जागतिक बाजारपेठेमुळे दिसून येते. टिप्स2ट्रेड्सचे AR रामचंद्रन यांनी मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवस शुभ असतो, या कारणामुळे स्टॉक खरेदी करू नये. स्टॉकच्या मूलभूत आणि तांत्रिक बाबी लक्षात घेऊन खरेदी करावी. तसंच बहुतांश कंपन्यांनी त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत, ते बघून गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करावेत, असा सल्ला देण्यात आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2023 9:59 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेंडिगमध्ये प्रॉफिट होतो की लॉस? मागील 10 वर्षांचा असा हा शेअर मार्केटचा रेकॉर्ड