बँकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडली, शेणाची गादी बनवली; आता फेमस ब्रँड, पुणेकर देवयाणीची कहाणी
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Inspiring Story: पुण्यातील महिलेने बँकेतील नोकरी सोडून शेणा-मातीपासून वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. आता त्यांची लाखोंची उलाढाल आहे.
पुणे – पारंपरिक नोकरीची चौकट मोडून स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना आकार देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बँकेतील 40 हजारांच्या स्थिर नोकरी सोडून देत धनकवडी येथील देवयानी तांबोळी यांनी ‘माय माती’ या नावाने अत्यंत आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक व्यवसाय उभा केला आहे. गाईच्या शेणापासून गादी, रांगोळी, आसन, दिवे तर खास लॅब-टेस्टेड मातीपासून स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आणि पाण्याची भांडी तयार करून एक वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.
लहानपणापासून निसर्गोपचार, माती आणि पारंपरिक पद्धती यांविषयी रुजलेली आवड टिकवून ठेवत देवयानी तांबोळी जवळपास आठ वर्षे बँकिंग क्षेत्रात कार्यरत होत्या. मात्र, व्यवसायात काहीतरी वेगळं आणि उपयुक्त करायचं ठरवल्यानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी नोकरीला रामराम केला. त्यानंतर मिट्टी हब या ब्रँडअंतर्गत मातीपासून विविध भांडी तयार करण्याचा प्रयोग सुरू केला. लॅबमध्ये तपासून प्रमाणित केलेल्या मातीपासून बनविलेली किचन उपयुक्त वस्तू ग्राहकांना मिळू लागल्याने त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.
advertisement
कॅन्सरने मुलगा गेला, विजय बनले अनाथांचे नाथ; 150 मुलांना घडवलं, 19 मुलींचं लावलं लग्न, प्रवास सुरूच!
गाईच्या शेणापासून विविध वस्तू
याच प्रक्रियेतून पुढे जात त्यांनी गाईच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याचा संशोधनप्रवास सुरू केला. दोन वर्षांच्या सततच्या प्रयोगांनंतर त्यांनी ॲक्युप्रेशर फोल्डेबल गादी तयार करण्यात यश मिळवले आणि या संकल्पनेचं पेटंटही त्यांच्या नावावर नोंद झालं. भारतीय संस्कृतीत गाईचे शेण आणि गोमूत्र हे आरोग्यवर्धक मानले जाते. पूर्वी घरांच्या भिंती व अंगण शेणाने लिपायची परंपरा होती. त्या आरोग्यदायी गुणांचा अभ्यास करून शेणापासून तयार केलेल्या रांगोळ्या, आसन, लॅम्प, आणि अनेक उपयुक्त वस्तूंना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला.
advertisement
माती व शेणाच्या 70-80 वस्तूंची निर्मिती
सध्या त्यांच्याकडे माती व शेणापासून तयार होणाऱ्या तब्बल 70 ते 80 वस्तूंची रेंज आहे. किमान 150 रुपयांपासून किमतीची ही उत्पादने स्वस्त, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असल्याने बाजारातही त्यांची मागणी वेगाने वाढताना दिसते. मातीच्या व्यवसायाला दहा वर्षे पूर्ण झाली असली तरी शेणापासून उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय हा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाला आहे. या व्यवसायासाठी कुटुंबियांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.
advertisement
पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि देसी पद्धतीला आधुनिकतेची जोड देत देवयानी तांबोळी यांनी उभारलेला माय माती आणि मिट्टी हब हा उपक्रम आज अनेक तरुण उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 2:45 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बँकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडली, शेणाची गादी बनवली; आता फेमस ब्रँड, पुणेकर देवयाणीची कहाणी








