Reliance Q4 Results: रिलायन्स इंडस्ट्रीजचा चौथा तिमाही निकाल- ग्राहकांच्या ताकदीवर नफा वाढला, लाभांश जाहीर

Last Updated:

Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आज आर्थिक वर्ष 2025च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.निकालांनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची एकत्रित इक्विटी पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

News18
News18
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने वित्तीय वर्ष 2024-25 आणि चौथ्या तिमाहीचे (Q4) निकाल जाहीर केले आहेत. या निकालांनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची एकत्रित इक्विटी पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कंपनीने वर्षभरात आणि तिमाहीमध्येही चांगली कामगिरी नोंदवली आहे.
वित्तीय वर्ष 2024-25 (FY2024-25) मधील प्रमुख आकडेवारी:
रिलायन्सने 1,071,174 कोटी रुपये (125.3 अब्ज डॉलर्स) चा विक्रमी वार्षिक एकत्रित महसूल नोंदवला. जो मागील वर्षाच्या तुलनेत 7.1% अधिक आहे. ग्राहक व्यवसाय आणि ओटूसी (O2C) विभागातील सततच्या वाढीमुळे हे शक्य झाले. कंपनीचा वार्षिक एकत्रित EBITDA (व्याज, कर, घसारा आणि परिशोधनपूर्व नफा) 2.9% नी वाढून 1,83,422 कोटी रुपये (21.5 अब्ज डॉलर्स) झाला. ज्यामध्ये ग्राहक व्यवसायाचे मोठे योगदान राहिले.
advertisement
वार्षिक एकत्रित कर पश्चात नफा आणि सहयोगी व संयुक्त उपक्रमांमधील नफ्याचा/तोट्याचा वाटा 2.9% नी वाढून 81,309 कोटी रुपये (9.5 अब्ज डॉलर्स) नोंदवला गेला.
संपूर्ण वर्षातील भांडवली खर्च 1,31,107 कोटी रुपये (15.3 अब्ज डॉलर्स) होता.
31 मार्च 2025 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे निव्वळ कर्ज मागील वर्षाच्या तुलनेत थोडे वाढले असून ते 1,17,083 कोटी रुपये अधिक आहे.
advertisement
चौथ्या तिमाहीतील (Q4 FY2024-25) प्रमुख आकडेवारी (मार्च 2025 अखेर):
> तिमाहीतील एकत्रित सकल महसूल 2,88,138 कोटी रुपये (33.7 अब्ज डॉलर्स) होता, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 8.8% अधिक आहे. ओटूसी आणि ग्राहक व्यवसायाच्या उत्तम कामगिरीमुळे ही वाढ झाली.
> ग्राहक व्यवसायाच्या चांगल्या कामगिरीमुळे तिमाहीचा EBITDA 3.6% (वर्ष-दर-वर्ष) नी वाढून 48,737 कोटी रुपये (5.7 अब्ज डॉलर्स) झाला.
advertisement
> कर आणि सहयोगी व संयुक्त उपक्रमांचा वाटा वगळता तिमाहीचा नफा 6.4% (वर्ष-दर-वर्ष) नी वाढून 22,611 कोटी रुपये (2.6 अब्ज डॉलर्स) राहिला.
> तिमाहीतील एकत्रित भांडवली खर्च 36,041 कोटी रुपये (4.2 अब्ज डॉलर्स) होता.
जिओ प्लॅटफॉर्म्सची कामगिरी:
> जिओ प्लॅटफॉर्म्सचा तिमाहीतील EBIDTA 18.5% (वर्ष-दर-वर्ष) नी वाढून 17,016 कोटी रुपये झाला.
> तिमाहीसाठी जिओचा निव्वळ नफा 25.7% (वर्ष-दर-वर्ष) नी वाढून 7,022 कोटी रुपये नोंदवला गेला.
advertisement
> तिमाहीत जिओने 61 लाख नवीन ग्राहक जोडले. यामुळे 31 मार्च 2025 पर्यंत जिओच्या ग्राहकांची संख्या 48 कोटी 82 लाख झाली आहे, ज्यामध्ये 19 कोटी 10 लाख ट्रू ५जी ग्राहक आहेत.
> वित्तीय वर्ष 2024-25 साठी जिओचा ARPU (प्रति युजर सरासरी महसूल) टॅरिफ वाढ आणि उत्तम ग्राहक मिश्रण यामुळे 206.2 रुपयांपर्यंत पोहोचला.
advertisement
> जिओ नेटवर्कवरील डेटा वापर प्रति ग्राहक प्रति महिना 33.6 जीबी होता आणि तिमाहीत एकूण डेटा वापर 19.6% नी वाढून 48.9 अब्ज जीबी झाला. व्हॉइस ट्रॅफिक 3.5% नी वाढून 1.49 ट्रिलियन मिनिटे झाला.
रिलायन्स रिटेलची कामगिरी:
> रिलायन्स रिटेलने वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 3,30,870 कोटी रुपयांचा सकल महसूल नोंदवला. जो मागील वर्षाच्या तुलनेत 7.9% अधिक आहे. मार्च 2025 च्या तिमाहीत रिटेलचा महसूल 88,620 कोटी रुपये होता. जो मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 15.7% अधिक आहे.
advertisement
> रिलायन्स रिटेलचे ग्राहक ब्रँड्स भारतातील सर्वात वेगाने वाढणारी एफएमसीजी कंपनी बनली आहे. कार्यान्वित झाल्याच्या दुसऱ्याच वर्षात तिची विक्री 11,450 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
> तिमाहीत रिलायन्स रिटेलचा EBITDA 14.3% (वर्ष-दर-वर्ष) नी वाढून 6,711 कोटी रुपये झाला आणि EBITDA मार्जिन 8.5% राहिला.
> तिमाहीत रिटेल व्यवसायात 1,085 नवीन स्टोअर्स उघडले. ज्यामुळे एकूण स्टोअर्सची संख्या 19,340 पर्यंत पोहोचली आहे. जी 7.74 कोटी चौरस फुटांमध्ये पसरलेली आहेत.
> 34.90 कोटी नोंदणीकृत ग्राहक आधारसह रिलायन्स रिटेल देशातील सर्वात पसंतीचे किरकोळ विक्रेत्यांपैकी एक बनले आहे. एकूण 36.10 कोटी व्यवहार नोंदवले गेले. जे वर्ष-दर-वर्ष 16.1% अधिक आहेत. डिजिटल कॉमर्स आणि न्यू कॉमर्सने एकूण महसुलात 18% योगदान दिले.
ओटूसी (O2C) व्यवसायाची कामगिरी:
> ओटूसी व्यवसायाचा तिमाही महसूल 0.4% (वर्ष-दर-वर्ष) नी घटून 6,449 कोटी रुपये राहिला. गॅसचे कमी उत्पादन आणि केजीडी६ मधून कमी तेल काढणी हे त्याचे कारण होते. मात्र, केजीडी६ फील्डमधील गॅसच्या वाढलेल्या किमती आणि सीबीएमच्या वाढलेल्या उत्पादनामुळे या घटीचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाला.
> विविध कारणांमुळे रिलायन्सच्या ओटूसी व्यवसायाचा EBITDA 10.0% (वर्ष-दर-वर्ष) नी घटून 15,080 कोटी रुपये (1.8 अब्ज डॉलर्स) राहिला.
जिओ-बीपी (Jio-bp):
जिओ-बीपी ब्रँड अंतर्गत, रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडचे (RBML) देशभरात 1,916 पेट्रोल पंप आहेत. जे 2020 च्या चौथ्या तिमाहीत 1,729 होते. RBML च्या एचएसडी, एमएस आणि एटीएफच्या विक्रीत अनुक्रमे 24.4%, 35.4% आणि 46.8% (वर्ष-दर-वर्ष) वाढ झाली. तर उद्योगातील विक्री वाढ अनुक्रमे 0.9%, 5.6% आणि 6.4% होती.
तेल आणि वायू व्यवसाय:
तिमाहीतील तेल आणि वायू व्यवसायाचा EBITDA 8.6% नी घटून 5,123 कोटी रुपये (वर्ष-दर-वर्ष) राहिला. वन-टाइम मेंटेनन्स आणि सरकारी लेव्हीमुळे ऑपरेटिंग खर्च वाढला. केजीडी6 मधून चौथ्या तिमाहीतील गॅसचे उत्पादन 26.73 MMSCMD आणि तेल/कंडेनसेटचे उत्पादन 19,600 बॅरल प्रति दिन होते. सध्याचे गॅस उत्पादन 27.3 MMSCMD आणि तेल/कंडेनसेट 20,600 बॅरल प्रति दिन आहे.
लाभांश (Dividend):
रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्च 2025 मध्ये संपलेल्या वर्षासाठी प्रति शेअर 5.5 रुपये लाभांशाची घोषणा केली आहे.
रिलायन्सचा न्यू एनर्जी ग्रोथ इंजिन भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरेल- मुकेश अंबानी
बदलत्या भू-राजकीय परिस्थिती आणि कमकुवत आर्थिक परिस्थितींमुळे आर्थिक वर्ष 2025 हे जागतिक व्यवसायासाठी एक आव्हानात्मक वर्ष ठरले. परिचालनातील शिस्त, ग्राहक केंद्रित नवकल्पना आणि भारताच्या विकासात्मक गरजांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे रिलायन्सने या वर्षभरात मजबूत आर्थिक कामगिरी केली.
ऊर्जा बाजारांतील अस्थिरतेनंतरही ‘ऑइल टू केमिकल’ व्यवसायाने उत्तम कामगिरी केली. डाउनस्ट्रीम रसायन बाजारांमध्ये मागणी-पुरवठा असंतुलनामुळे गेल्या काही वर्षांपासून नफा कमी होता. आमच्या व्यावसायिक टीम्सनी मूल्यसाखळीत नफा वाढवण्यासाठी एकत्रित ऑपरेशन्स आणि फीडस्टॉक खर्चांमध्ये सुधारणा केली आहे. ऑइल अँड गॅस व्यवसायाने आमच्या KGD6 आणि CBM ब्लॉक्समधील उच्च उत्पादनामुळे आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक EBITDA नोंदवला आहे.
रिटेल विभागानेही सातत्याने वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये आम्ही आमच्या स्टोअर नेटवर्कच्या धोरणात्मक पुनर्संरचनेवर लक्ष केंद्रित केले. ज्याचा उद्देश ऑपरेशनल कार्यक्षमता आणि दीर्घकालीन स्थिरता वाढवणे होता. सर्वच स्वरूपांमध्ये आमचा सुधारित प्रॉडक्ट कॅटलॉग आणि ग्राहक अनुभव यामुळे ग्राहकांशी आमचे संबंध अधिक मजबूत झाले आहेत. जलद, हायपरलोकल डिलिव्हरीनं बाजारात महत्त्वपूर्ण स्थान व गती प्राप्त केली असून ती ग्राहकांशी दृढपणे जोडलेली आहे. ओम्नी-चॅनल ऑफरिंग्ज आणि विस्तृत उपस्थिती रिलायन्स रिटेलला सर्व ग्राहकांना अधिक चांगले मूल्य देण्यास सक्षम बनवते.
आमच्या डिजिटल सेवा व्यवसायाने विक्रमी महसूल आणि नफा कमावला आहे. ग्राहकसंख्येमध्ये झालेली सातत्यपूर्ण वाढ ही कमाई वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरली. आमच्या ५जी सेवा आणि होम ब्रॉडबँड ऑफरिंगला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकसंख्या आणि होम-कनेक्ट्स यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिओ इनोव्हेशनमध्ये गुंतवणूक करत राहील. भारताच्या डिजिटल भविष्याची दिशा ठरवणाऱ्या एआय क्षमतेकडे आणि पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाकडे आमचे लक्ष केंद्रित राहील.
FY25 दरम्यान आम्ही अक्षय ऊर्जा आणि बॅटरी व्यवसायासाठी आमच्या प्रकल्पांची एक मजबूत पायाभरणी केली आहे. येणाऱ्या तिमाहींमध्ये हे व्यवसाय ‘इनक्युबेशन’ अवस्थेतून ‘ऑपरेशनल’ अवस्थेत रूपांतरित होताना दिसतील. मला ठाम विश्वास आहे की रिलायन्सचा न्यू एनर्जी ग्रोथ इंजिन भारतासाठी आणि जगासाठीही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. - मुकेश अंबानी, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
जिओ सातत्याने ग्राहकांपर्यंत जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध सेवा पोहोचवत आहे. जगातील सर्वात मोठ्या आयोजनांपैकी एक असलेल्या महाकुंभमध्ये आमच्या मजबूत आणि उत्कृष्ट नेटवर्कच्या जोरावर जिओने कोट्यवधी श्रद्धाळूंना सेवा पोहोचवल्याचा आम्हाला अभिमान आहे. जिओ आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मूलभूत पायाभूत संरचनेच्या निर्मितीत व्यस्त आहे. जेणेकरून जिओच्या सर्व सेवांमध्ये इंटेलिजन्सचा आणखी एक घटक जोडता येईल.- आकाश एम. अंबानी, चेअरमन, रिलायन्स जिओ इन्फोकॉम
रिलायन्स रिटेलने महसूल आणि नफ्यात दोन्हीत अत्युत्तम वाढ नोंदवली आहे. आम्ही आमच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे. नाविन्यपूर्ण स्वरूप सादर करून आम्ही उत्पादनांचे मिश्रण अधिक चांगले केले आहे. आम्ही तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली आहे आणि ग्राहकांना आमच्याकडून काय अपेक्षित आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. रिटेलचा भविष्यकाळ अधिक उज्ज्वल बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.- ईशा एम. अंबानी, कार्यकारी संचालिका, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड
मराठी बातम्या/मनी/
Reliance Q4 Results: रिलायन्स इंडस्ट्रीजचा चौथा तिमाही निकाल- ग्राहकांच्या ताकदीवर नफा वाढला, लाभांश जाहीर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement