Reliance Industries AGM 2025: मुकेश अंबानी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, 5 गोष्टी तुमचं आयुष्य बदलणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
RIL AGM 2025 Today: हा 50 कोटींचा टप्पा तुमच्या अतूट विश्वास आणि समर्थनाचे प्रतीक आहे. मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो," असे मुकेश अंबानी म्हणाले.
RIL 48th Annual General Meeting: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी कंपनीच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओच्या गेल्या 10 वर्षांतील प्रवासाचे कौतुक केलं. या वेळी त्यांनी जिओच्या पाच प्रमुख कामगिरींची माहिती दिली. जिओने 50 कोटींचा ग्राहक टप्पा ओलांडला असून, 2026 च्या पहिल्या सहामाहीत जिओचा आयपीओ (IPO) आणण्याची तयारी सुरू असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही केली.
"पुढील आठवड्यात जिओ देशासाठी आपल्या सेवेची 10 वर्षे पूर्ण करत आहे. मागे वळून पाहताना, ही वर्षे भारताच्या डिजिटल इतिहासातील सर्वात गौरवशाली राहिली आहेत. आज मला अभिमानाने सांगायचे आहे की, जिओ कुटुंबाने 50 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. हा 50 कोटींचा टप्पा तुमच्या अतूट विश्वास आणि समर्थनाचे प्रतीक आहे. मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो," असे मुकेश अंबानी म्हणाले.
advertisement
जिओची पाच प्रमुख कामगिरी
अंबानींनी जिओच्या यशस्वी वाटचालीतील पाच प्रमुख टप्पे सांगितले:
व्हॉइस कॉल मोफत: जिओने भारतातील सर्व व्हॉइस कॉल मोफत केले.
डिजिटल सवयी: जिओमुळे सर्वसामान्य भारतीयांना मोबाईलवर व्हिडिओ पाहण्याची आणि डिजिटल पेमेंट करण्याची सवय लागली.
advertisement
डिजिटल पायाभरणी: आधार, यूपीआय, जन धन आणि थेट बँक हस्तांतरणासारख्या भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरची पायाभरणी जिओने केली.
स्टार्ट-अप इकोसिस्टम: जिओमुळे भारतात १०० हून अधिक युनिकॉर्न कंपन्यांसह जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम तयार झाली.
5G रोलआउट: जिओने जगातील सर्वात जलद गतीने ५-जी रोलआउट करून भारतात 'एआय क्रांती'चा (AI Revolution) पाया रचला आहे.
advertisement
भविष्यातील योजना
जिओच्या भविष्यातील योजना पाच आश्वासनांवर आधारित असल्याचे अंबानींनी सांगितले
संपूर्ण कनेक्टिव्हिटी: जिओ प्रत्येक भारतीयाला मोबाईल आणि होम ब्रॉडबँडने जोडेल.
डिजिटल होम: जिओ प्रत्येक भारतीय घराला जिओ स्मार्ट होम, जिओटीव्ही+, जिओ टीव्ही ओएस आणि स्वयंचलित सेवांनी सुसज्ज करेल.
व्यवसायांचे डिजिटायझेशन: जिओ प्रत्येक भारतीय व्यवसायाला साध्या, स्केलेबल आणि सुरक्षित प्लॅटफॉर्मसह डिजिटल करेल.
advertisement
एआय क्रांती: जिओ भारतात एआय क्रांती घडवून आणेल. 'एआय सर्वत्र, प्रत्येकासाठी' हे आमचे ब्रीदवाक्य आहे.
जागतिक विस्तार: जिओ आपले कार्य भारताबाहेरही वाढवेल आणि आपली स्वदेशी तंत्रज्ञान जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Reliance Industries AGM 2025: मुकेश अंबानी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, 5 गोष्टी तुमचं आयुष्य बदलणार


