एकावर 3 शेअर फ्री! किमतही फक्त 3 रुपये, तरीही का विकत घेत नाहीत लोक?

Last Updated:

या आठवड्यात 30 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या शिखर लीजिंग अँड ट्रेडिंगचे शेअर्स फोकसमध्ये असतील, त्याचं कारण काय, जाणून घेऊयात.

News18
News18
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याजवळ असलेल्या रकमेत वाढ व्हावी, यासाठी लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. जोखीम असली तरी परतावा जास्त असल्याने गुंतवणूकदार ही जोखीम पत्करायला तयार असतात. या आठवड्यात 30 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या शिखर लीजिंग अँड ट्रेडिंगचे शेअर्स फोकसमध्ये असतील, त्याचं कारण काय, जाणून घेऊयात.
शिखर लीजिंग अँड ट्रेडिंगचे शेअर्स कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना बोनस शेअर्स देणार आहे. त्यासाठी 4 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीच्या एका शेअरची किंमत बीएसईवर 3.15 रुपये आहे. ही किंमत 10 जानेवारी 2008 ची आहे. म्हणजे 16 वर्षांपासून शेअरची किंमत तीच आहे, तेव्हापासून या शेअरचं ट्रेडिंग बंद आहे.
advertisement
बीएसईच्या आकडेवारीनुसार, शिखर लीजिंग अँड ट्रेडिंग लिमिटेड शेअर्सची शेवटची ट्रेडिंग किंमत 3.15 रुपये प्रति शेअर आहे. या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांक 3.15 रुपये आहे. ही एनबीएफसी क्षेत्रातील कंपनी आहे. 3:1 च्या रेशोमध्ये बोनस शेअर्स देण्याची शिफारस कंपनीने केली होती. म्हणजेच शेअरधारकांना रेकॉर्ड डेटला कंपनीकडे नोंदवलेल्या प्रत्येक एका शेअरसाठी तीन बोनस शेअर्स मिळतील. शिखर लीजिंग आणि ट्रेडिंग शेअर्ससाठी एक्स-बोनस डेट 4 ऑक्टोबर 2024 आहे.
advertisement
बोनस शेअर म्हणजे काय?
कंपनीकडून जे अतिरिक्त शेअर्स विद्यमान शेअरधारकांना दिले जातात, त्याला बोनस शेअर्स असे म्हणतात. शेअरधारकांकडे आधीचे जे शेअर्स असतात, त्याच्या संख्येवर आधारित शेअर्सचे वाटप कंपनी करते. तुमच्याकडे 10:1 बोनस इश्यु असेल तर याचा अर्थ कंपनी रेकॉर्ड तारखेला नोंद असलेल्या शेअरधारकांसाठी असलेल्या प्रत्येक शेअरसाठी 10 बोनस शेअर जारी करते.
advertisement
बोनस शेअरचे नियम पुढील महिन्यापासून बदलणार आहेत. नुकतेच बाजार नियामक सेबीने बोनस शेअर खात्यात एंट्री व व्यवहार प्रक्रियेत तेजी यावी यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. या अंतर्गत गुंतवणूकदार रेकॉर्ड तारखेनंतर दोन दिवसांत बोनस शेअर्समध्ये व्यवहार करू शकतात. 1 ऑक्टोबरपासून ही सिस्टिम लागू होणार आहे. मार्गदर्शकतत्त्वांनुसार, बोनस शेअर्सचे व्यवहार आता रेकॉर्ड तारखेनंतर कामकाजाचाच्या फक्त दोन दिवस (T+2) होऊ शकतील. यामुळे विलंब कमी होईल व बाजाराची कार्यक्षमता वाढेल.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
एकावर 3 शेअर फ्री! किमतही फक्त 3 रुपये, तरीही का विकत घेत नाहीत लोक?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement