तुमच्या पोर्टफोलिओत हे 5 शेअर आहेत का? 2025 मध्ये करतील कमाल, तुम्हीही व्हाल मालामाल
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Share Market: सध्या अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. 2025 मध्ये चांगल्या परताव्यासाठी हे 5 शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओत असलेच पाहिजे.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : नवीन वर्षांत गुंतवणुकीचा संकल्प सोडला असेल तर शेअर बाजारात तुम्हीही नशीब आजमावू शकता. 2024 मध्ये शेअर बाजारावर सर्वच घटकांचा परिणाम झाला. तरीही गुंतवणूकदारांना बहुतांश फायदा झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच शेअर बाजाराविषयी गुंतवणूकदार अलर्ट आहेत. नवीन वर्षात, 2025 मध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल याविषयी गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. याबाबत गुंतवणूक सल्लागार रुचीर थत्ते यांनी लोकल18 सोबत बोलताना टॉपचे 5 शेअर्स सांगितले आहेत.
advertisement
1. मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड -
3300 कोटी रुपयांची मार्केट कॅप असणारा मोनार्च ग्रुप ही फायनान्स क्षेत्रातील कंपनी आहे. स्टॉक ब्रोकिंग पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस म्युच्युअल फंड बॉण्ड्स, एफडी लाइफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, मर्चंट बँकिंग, बँकिंग इक्विटी ॲडव्हायझरी सर्विसेस अशा अनेक सर्विसेस ही कंपनी करते. जानेवारी 2022 ला 74 रुपयाला या कंपनीचा शेअर होता. एनएससी वर 80 रुपयांच्या आसपास लिस्ट होऊन तीन वर्षातच 420 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. 21 चा प्राईस टू अर्निंग रेशो व जवळपास 40 ते 50 टक्क्याचे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी ही कंपनी मेंटेन करत आहे. दरवर्षी या कंपनीच्या महसुलामध्ये देखील चांगली वाढ होत असून यावर्षी आत्तापर्यंत 333 कोटी रुपयांचा विक्री व जवळपास 50 टक्केच्या नेट प्रॉफिटने दीडशे कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. या कंपनीमध्ये पुढील वर्षात खूप चांगल्या पद्धतीने वाढ अपेक्षित आहे व जवळपास 20 ते 30 टक्क्यांच्या आसपासचे रिटर्न या कंपनीकडून अपेक्षित आहेत.
advertisement
2. इन्फोसिस –
इन्फोसिस ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील लीडिंग व निफ्टी मध्ये असलेली एक लार्ज कॅप कंपनी आहे. 2000 साली स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाल्यापासून ही कंपनी दरवर्षी जवळपास 15 ते 16 टक्क्यांचा रिटर्न देत आहे. सद्यस्थितीला 1940 रुपयांच्या आसपास या कंपनीचा शेअर ट्रेड करत असून दोन वर्षांचा म्हणजेच जानेवारी 2022 पासूनचा असलेला 1935 चा हाय तोडून या कंपनीने गेल्याच आठवड्यात 2000 ला क्लोजिंग दिलेले आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या कन्सोलिडेशन पिरेड मधून बाहेर पडल्यामुळे पुढच्या वर्षात या कंपनीकडून खूप चांगल्या प्रमाणात रिटर्नची अपेक्षा आहे. तसेच गुंतवणुकीसाठी हा सद्यस्थितीला खूप चांगला शेअर आहे.
advertisement
3. मेड प्लस –
मेड प्लस फार्मसी क्षेत्रातील एक नामांकित नाव व 4230 पेक्षा जास्त मेडिकल शॉपची चेन जी भारतातल्या 600 पेक्षा जास्त शहरांमध्ये कार्यरत आहे. 2006 मध्ये सुरुवात झालेल्या या कंपनीने 18 वर्षांच्या आतच उत्तुंग असे यश मिळवलेले आहे. डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचा आयपीओ लोन्च झाला होता आणि 1000 च्या आसपास ओपन झाल्यानंतर 1300 च्या आसपास वर जाऊन जवळपास 560 च्या आसपास या कंपनीचा शेअर खाली आला होता. त्यानंतर गेली दोन वर्षे या कंपनीच्या शेअरमध्ये एक कन्सोलिटेशन चालू होते व दोन आठवड्यापूर्वी या शेअरने 760 चा हाय ब्रेक करून त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने क्लोज दिलेले आहे. त्यामुळे येत्या कालावधीसाठी हा शेअर परत 1300 च्या आसपासची लेव्हल आपल्याला बघायला मिळेल असा एक अंदाज शेअरचा चार्ट कडे बघितल्यावर दिसत आहे. म्हणजेच पुढील जवळपास एक वर्षात या कंपनीच्या शेअर कडून 50 टक्केच्या आसपासच्या रिटर्न्सची अपेक्षा असल्याचं थत्ते सांगतात.
advertisement
4. लॉईड मेटल अँड एनर्जी लिमिटेड –
मेटल क्षेत्रातील ही एक नामांकित कंपनी जुलै 2023 ला 550 च्या आसपास या कंपनीच्या शेअर लिस्ट झाला. त्याच्यामधून जवळपास दीड वर्षातच या कंपनीने 1160 या प्राईसचा उच्चांक गाठला आहे. मेटल क्षेत्रातील ही खूप चांगली कंपनी आहे. गेल्या 10 वर्षात जवळपास या कंपनीच्या विक्रीमध्ये दहा पटीपेक्षा वाढ झालेली आहे. गेल्या काही वर्षात या कंपनीने आपले मार्जिन देखील सुधारले असून 2024 मध्ये या कंपनीचा 1240 कोटींचा नेट प्रॉफिट नोंदवला गेला होता. आपल्या कर्जामध्ये देखील या कंपनीने खूप चांगली सुधारणा केलीये. 155 कोटीचे कर्ज जवळपास 36 कोटी रुपयांवर आणून ठेवलेले आहे. 2024 मध्ये देखील या कंपनीच्या शेअरमध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढ बघायला मिळाली असून या कंपनीचा शेअर एका वर्षात जवळपास दुप्पट झाला आहे. 2025 मध्ये देखील ही वाढ अशीच कायम राहण्याची शक्यता आहे व या शेअरमध्ये देखील आपण 30 ते 40 टक्क्यांचे रिटर्न 2025 या वर्षात अपेक्षित धरू शकतो.
advertisement
5. गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड
रिअल इस्टेट क्षेत्रातील ही कंपनी असून 21 च्या प्राईज टू अर्निंग रेशो सह ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. तसेच जवळपास 45 टक्क्यांच्या आसपासचा आरओई व आरओसीइ नोंदवत आहे. 73 टक्क्यांचे प्रमोटरचे होल्डिंग असून यातील कोणतेही शेअर्स प्लीज करण्यात आलेले नाहीत.गेल्या 4 वर्षात या कंपनीच्या विक्रीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असून 2021 यावर्षी 168 कोटी रुपयांना असणारे सेल्स 2024 मध्ये 910 कोटी रुपयांना जाऊन पोचले आहेत. जवळपास 70 टक्क्यांचे मार्जिन गेले दोन वर्ष ही कंपनी नोंदवत असून 460 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट या कंपनीने नोंदवला आहे
advertisement
2020 साठी 533 कोटी रुपये कर्ज या कंपनीने 2024 मध्ये 28 कोटींवर आणून ठेवलेले आहे. म्हणजेच या कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये गेल्या चार-पाच वर्षात खूप जास्त प्रमाणात वाढ आपल्याला बघायला दिसून येत आहे त्याचप्रमाणे या कंपनीच्या शेअरमध्ये देखील खूप जास्त प्रमाणात वाढ झाली असून 2008 सालच्या 560 रुपयांचा आपला हाय या कंपनीने 2024 मध्ये म्हणजे जवळपास 16 वर्षांनी मोडला आहे. सध्या या कंपनीचा शेअर 1260 रुपयांना ट्रेड करत आहे. या कंपनीमध्ये देखील पुढील एक वर्षांसाठी खूप चांगल्या प्रकारात ग्रोथ अपेक्षित असून हा शेअर देखील आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणे गरजेचे आहे.
(Disclaimer: इथं दिलेली माहिती तज्ज्ञ आणि एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे जोखिमेचं आहे. विशेषतः F&O सेगमेंटमध्ये ट्रेडिंग खूप जोखिमयुक्त असते. यामुळे इन्व्हेस्टमेंटपूर्वी एखाद्या सर्टिफाइड आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 22, 2024 10:01 AM IST
मराठी बातम्या/Share Market/
तुमच्या पोर्टफोलिओत हे 5 शेअर आहेत का? 2025 मध्ये करतील कमाल, तुम्हीही व्हाल मालामाल