शेअर बाजारात नवीन आहात? समजून घ्या IPO म्हणजे नेमकं काय, यात गुंतवणूक करावी की नाही...

Last Updated:

IPO Explainer: जेव्हा एखाद्या कंपनीला एक्सपान्शनची गरज असते म्हणजेच कंपनीचा विस्तार करायचा असतो तेव्हा नव्यानं बाजारात येण्यासाठी कंपनीचे संचालक आयपीओ लाँच करतात.

+
इनिशियल

इनिशियल पब्लिक ऑफरिंग.

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे 'आयपीओ' हा शब्द आपल्या कानावर पडलाच असेल. आयपीओ हा शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक मार्ग आहे.
आयपीओ म्हणजे 'इनिशियल पब्लिक ऑफरिंग' अर्थात प्रारंभिक भागविक्री. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात खासगी मालकीची कंपनी पहिल्यांदा लोकांना आपले शेअर्स ऑफर करून सार्वजनिक-व्यापारी कंपनी बनते. यासाठी कंपन्‍या शेअर बाजारात स्‍वत:ला लिस्‍टेड म्हणजेच सूचीबद्ध करून शेअरमध्‍ये गुंतवणूकदारांसाठी विक्री प्रस्‍ताव आणतात. शेअर बाजारात लिस्‍टेड झाल्‍यामुळे कंपनीची विस्‍तृत माहिती सार्वजनिक होते.
advertisement
आयपीओच्या माध्यमातून कंपनी ठराविक शेअर्स विक्रीला काढते. आयपीओतील शेअरचा लॉट आणि किंमत ठरलेली असते. हा आयपीओ ठराविक दिवशी सबस्क्रिप्शनसाठी खुला होतो आणि काही दिवस खुला असतो. इच्छुक गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करू शकतात. आयपीओचं सबस्क्रिप्शन बंद झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी या आयपीओचं वाटप होतं. त्यानंतर हा शेअर राष्ट्रीय शेअर बाजार (NSE), मुंबई शेअर बाजार (BSE) किंवा दोन्ही बाजारात सूचीबद्ध होतो. एकदा शेअर सूचीबद्ध झाला की कोणीही ते शेअर विकू शकतं. सर्वसामान्यपणे शेअरच्या किंमतीचा अंदाज घेऊन गुंतवणूकदार हा निर्णय घेत असतात.
advertisement
कंपनी का आणते आयपीओ?
जेव्हा एखाद्या कंपनीला एक्सपान्शनची गरज असते म्हणजेच कंपनीचा विस्तार करायचा असतो तेव्हा नव्यानं बाजारात येण्यासाठी कंपनीचे संचालक आयपीओ लाँच करतात. त्यासाठी सर्वात आधी सेबीकडून मान्यता मिळणं आवश्यक असतं. तिथूनच कंपनीला सर्व रीतसर बाबी सुपूर्द होतात. योग्य ती पडताळणी करूनच एखाद्या कंपनीचे शेअर्स खुले केले जातात.
आयपीओचे फायदे
कंपनीत सुरूवातीपासून भागीदार राहता येतं. लाँग टर्मसाठी शेअर्स घेता येतात, त्याचा फायदा होतो. तर बाजारातील अस्थिरतेत तोटा सहन करावा लागू शकतो.
advertisement
गुंतवणूक कशी करावी?
सर्वात आधी डीमॅट अकाउंट असणं आवश्यक असतं. ते असेल आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असेल तर डॅश बोर्डवर नवीन आलेले आयपीओ रजिस्टर करू शकता. त्याची किंमत खात्यातून रिझर्व केली जाते, अशी माहिती
ट्रेडर डॉ. गणेश जाधव यांनी दिली.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
शेअर बाजारात नवीन आहात? समजून घ्या IPO म्हणजे नेमकं काय, यात गुंतवणूक करावी की नाही...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement