Reliance चा शेअर करणार 'श्रीमंत', मॉर्गन स्टॅन्लेने दिले टॉप रेटिंग, किती टक्के रिटर्न देणार?

Last Updated:

ब्रोकरेजने केलेल्या दाव्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सध्याच्या मूल्यांकन आणि कमाईतील सुधारणा लक्षात घेता, कंपनी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

News18
News18
मुंबई: मॉर्गन स्टॅन्लेने रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) साठी मजबूत गुंतवणुकीचा अंदाज वर्तवला असून, कंपनीच्या शेअर्समध्ये 29 % वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्सच्या शेअर्सला दोन प्रमुख अपग्रेड मिळाल्याने, गेल्या तीन सत्रांमध्ये त्याच्या किंमतीत 8 % वाढ झाली आहे.
सीनएबीसी TV18 ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी, 10 मार्च रोजी मॉर्गन स्टॅन्लेने RIL साठी "ओव्हरवेट" रेटिंग कायम ठेवत 1,606 रुपये प्रति शेअरचा टार्गेट प्राइस दिलं आहे. ब्रोकरेजने केलेल्या दाव्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सध्याच्या मूल्यांकन आणि कमाईतील सुधारणा लक्षात घेता, कंपनी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे ज्या लोकांना शक्य आहे त्यांच्यासाठी हा शेअर खूप चांगला असल्याचा दावा ब्रोकरेज फर्मने केला आहे.
advertisement
कमाईत सुधारणा, रिफायनिंग आणि केमिकल व्यवसायात वाढ
गेल्या नऊ महिन्यांतील आव्हानांनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कमाईत सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. मॉर्गन स्टॅन्लेने नमूद केले की, या वर्षी कंपनीच्या रिफायनिंग व काही केमिकल व्यवसायांना नवसंजीवनी मिळाल्यासारखी परिस्थिती आहे. आशियातील केमिकल उद्योगातील गुंतवणुकीचे प्रमाणही अलीकडील नीचांकी पातळीवरून सुधारत आहे.
सीनएबीसी TV18 ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला दोन प्रमुख अपग्रेड मिळाले. कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजने रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी "अॅड" रेटिंग बदलून "बाय" केले आणि 1,400 रुपये प्रति शेअरचा टार्गेट प्राइस दिला. त्यानंतर, मॅक्वेरीनेही त्याचा रेटिंग "न्यूट्रल" वरून "आउटपरफॉर्म" केला आणि टार्गेट प्राइस 1,300 रुपयांवरून 1,500 रुपयांपर्यंत वाढवला.
advertisement
विश्लेषकांचा सकारात्मक दृष्टिकोन
रिलायन्स इंडस्ट्रीजवर एकूण 38 विश्लेषकांचे मूल्यांकन आहे, त्यापैकी 35 विश्लेषकांनी "बाय" तर 3 जणांनी "सेल" रेटिंग दिले आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास या स्टॉकवर वाढला आहे.
डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 7.38% वाढला
डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकत्रित निव्वळ नफा 7.38% वाढून 18,540 कोटी रुपये झाला, जो मागील वर्षी 17,265 कोटी रुपये होता. कंपनीच्या एकत्रित महसुलातही 6.79% वाढ झाली असून, तो 2,43,865 कोटींवर पोहोचला आहे.
advertisement
कंपनीचा एकत्रित EBITDA (मूलभूत ऑपरेशनल नफा) 7.8% वाढून 48,003 कोटी रुपये झाला, जो मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत 44,525 कोटी रुपये होता. EBITDA मार्जिन सप्टेंबर तिमाहीतील 17 % वरून 18% पर्यंत वाढले आहे.
शेअरचा परफॉर्मन्स आणि आगामी अंदाज
गेल्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 3.04% वाढून 1,246.4 रुपयांवर बंद झाला. सोमवारी सकाळी 9.20 वाजता हा 1,251.85 रुपयांवर होता, मात्र मागील सहा महिन्यांत स्टॉक 14.72% घसरला आहे. तरीही, ब्रोकरेज फर्म्सच्या सकारात्मक अंदाजामुळे आगामी काळात शेअरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
नेटवर्क18 आणि News18 Marathi या कंपन्या आणि वेबसाइट चालवतात. यांचे नियंत्रण इंडिपेंडेंट मीडिया ट्रस्टकडे आहे, ज्याचा एकमेव लाभार्थी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे.
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Reliance चा शेअर करणार 'श्रीमंत', मॉर्गन स्टॅन्लेने दिले टॉप रेटिंग, किती टक्के रिटर्न देणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement