पैसे तयार ठेवा! TATA च्या आणखी एका कंपनीचा IPO लाँच होणार, तारीख आताच नोट करा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
टाटा कॅपिटल्सने IPO आणण्याची घोषणा केली असून 23 कोटी नव्या इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. टाटा टेक्नोलॉजीजच्या यशस्वी लिस्टिंगनंतर टाटा समूहाचा हा पहिलाच IPO असेल.
मुंबई: टाटा उद्योग समूह मोठा आणि त्याच प्रमाणे त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार आतूर असतात. काही महिन्यांपूर्वी टाटा सन्सचा आयपीओ येणार अशी चर्चा सुरू होती. आता टाटाची आणखी एक कंपनी IPO आणण्याच्या तयारीत आहे. या कंपनीला IPO लाँच करण्यासाठी परवानगी मिळाली असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती कंपनी देईल असं सांगितलं जात आहे. टाटा कंपनीचा हा IPO घेण्यासाठी पैसे आतापासूनच तयार ठेवा कारण खूप कमी वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे. शिवाय टाटा म्हटल्यावर स्पर्धाही अधिक असेल.
टाटा समूहातील महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक टाटा कॅपिटल्स समजली जाते. टाटा कॅपिटल्सने अखेर आपल्या IPO आणण्याची घोषणा केली आहे. 25 फेब्रुवारी रोजी कंपनीने आपली IPO योजना जाहीर केली असून यामध्ये 23 कोटी नव्या इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय विद्यमान शेअरहोल्डर्ससाठी विक्रीसाठीही ऑफर (Offer For Sale) दिली जाणार आहे.
advertisement
विशेष म्हणजे, टाटा टेक्नोलॉजीजच्या यशस्वी लिस्टिंगनंतर टाटा समूहाकडून येणारा हा पहिलाच IPO असणार आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार साधारणपणे हा आयपीओ सप्टेंबरपर्यंत येऊ शकतो. कंपनीकडून IPO ची नेमकी तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
15,004 कोटी रुपयांचे मेगा इश्यू
कंपनीच्या बोर्डाने विद्यमान शेअरहोल्डर्ससाठी राइट्सच्या आधारे 15,004 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स जारी करण्याची मंजुरी दिली आहे. या IPO द्वारे कंपनीला मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे करता येईल आणि भविष्यातील विस्तारासाठी निधी उपलब्ध होईल. मनीकंट्रोल च्या अहवालानुसार, टाटा कॅपिटलने यासाठी सिरिल अमरचंद मंगलदास आणि कोटक महिंद्रा कॅपिटल या आघाडीच्या सल्लागार कंपन्यांची मदत घेतली आहे.
advertisement
आरबीआय नियमांचे पालन अनिवार्य
टाटा कॅपिटलचा IPO आणण्यामागे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आरबीआयचे नियमन. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, ‘अपर लेयर’ एनबीएफसी (NBFC) म्हणून वर्गीकृत असलेल्या कंपन्यांना तीन वर्षांच्या आत लिस्टिंग करणे बंधनकारक आहे. टाटा कॅपिटल फाइनान्शियल सर्व्हिसेसचा टाटा कॅपिटलमध्ये विलय जानेवारी 2024 मध्ये झाला असून, त्यामुळे सप्टेंबर 2025 पर्यंत लिस्टिंग करणे अनिवार्य आहे.
advertisement
कंपनीचे आर्थिक स्वरूप, AUM आणि भागीदारी
क्रिसिल रेटिंग्स च्या अहवालानुसार, 31 मार्च 2024 रोजी टाटा कॅपिटलचे AUM (Assets Under Management) 1,58,479 कोटी रुपये होते. यातील 92.83% शेअर्स टाटा सन्स कडे असून उर्वरित हिस्सेदारी इतर टाटा समूहातील कंपन्या आणि ट्रस्टकडे आहे. टाटा कॅपिटल ही नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) असून टाटा सन्सची सहाय्यक कंपनी आहे.
advertisement
IPO गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?
टाटा टेक्नोलॉजीजच्या यशस्वी लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना टाटा कॅपिटलच्या IPO कडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. टाटा समूहाचा विश्वासार्ह ब्रँड, मजबूत आर्थिक पार्श्वभूमी आणि वाढत्या NBFC मार्केटमुळे हा IPO गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरू शकतो. गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते, परंतु शेअर बाजारातील जोखमी लक्षात घेता सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 25, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
पैसे तयार ठेवा! TATA च्या आणखी एका कंपनीचा IPO लाँच होणार, तारीख आताच नोट करा