ICICI बँकेत झाला सर्वात मोठा विश्वासघात, डोक चक्रावून टाकणारा घोटाळा; फिक्स डिपॉझिट गायब, OTP थांबवले,पूल अकाउंट, बनावट लोन

Last Updated:

ICICI बँकेच्या कोटा शाखेत एक जबरदस्त घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेच्या माजी रिलेशनशिप मॅनेजरने 2 वर्षांत 4.58 कोटींहून अधिक रक्कम 110 खात्यांतून फसवणुकीने वळती केली. त्यामागे OTP हायजॅकपासून शेअर बाजारात गुंतवणूकपर्यंतचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत.

News18
News18
कोटा (राजस्थान) : आयसीआयसीआय बँकेच्या एका माजी रिलेशनशिप मॅनेजरला 4.58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. साक्षी गुप्ता असे तिचे नाव असून 2020 ते 2023 या कालावधीत ती कोटामधील श्रीराम नगर शाखेत कार्यरत होती. तिने सुमारे दोन वर्षांमध्ये 41 ग्राहकांच्या 110 खात्यांतून अनधिकृत व्यवहार करत ही फसवणूक केली.
ही फसवणूक सर्वप्रथम 18 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. त्यानंतर उद्योज नगर पोलिसांनी तपास सुरू करून 31 मे रोजी साक्षी गुप्ताला अटक केली.
शेअर बाजारात गुंतवणूक, मोबाईल क्रमांकात फेरफार
पोलिस तपासानुसार, गुप्ताने ग्राहकांच्या खात्यांतील पैसे परस्पर शेअर बाजारात गुंतवले परंतु त्या गुंतवणुकीत तिला मोठे नुकसान झाले. त्यानंतर तिने फसवणूक लपवण्यासाठी काही खात्यांचे मोबाइल नंबर बदलून स्वतःच्या नातेवाइकांचे क्रमांक लिंक केले. जेणेकरून मूळ खातेदारांना OTP वा व्यवहार सूचना मिळू नयेत.
advertisement
खाते वापरले 'पूल अकाउंट' म्हणून
उद्योज नगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक इब्राहीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ताने एका वृद्ध महिलेचे खाते 'पूल अकाउंट' म्हणून वापरले. फेब्रुवारी 2023 पर्यंत त्या खात्यातून 3 कोटी रुपयांहून अधिक रक्कम फिरवण्यात आली होती.
अन्य गंभीर गैरप्रकार
-40 खात्यांवर ग्राहकांच्या परवानगीशिवाय ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरु केली
-31 ठेवी मुदतीपूर्वी बंद करून 1.34 कोटी रुपये वळवले
advertisement
-डेबिट कार्ड, पिन व OTP चा गैरवापर करून ऑनलाइन व ATM व्यवहार
-3.4 लाख रुपयांचा बनावट वैयक्तिक कर्ज व्यवहार
-डिजिटल बँकिंग व इन्स्टा कीऑस्कचा वापर
गुप्ताने फसवणुकीतून मिळालेला पैसा अनेक डिमॅट खात्यांत वळवला, जेणेकरून तिचे आर्थिक व्यवहार मागोवा घेणे कठीण जावे.
बँकेची प्रतिक्रिया
आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले, ग्राहकांचे हित हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. फसवणूक लक्षात येताच आम्ही तत्काळ पोलिसांत FIR दाखल केली आणि संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले. आमच्याकडे फसवणुकीबाबत शून्य सहिष्णुतेची धोरण आहे. प्रभावित ग्राहकांच्या सर्व योग्य दाव्यांचे निवारण करण्यात आले आहे.
advertisement
गुप्ताला न्यायालयात हजर करून एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
ICICI बँकेत झाला सर्वात मोठा विश्वासघात, डोक चक्रावून टाकणारा घोटाळा; फिक्स डिपॉझिट गायब, OTP थांबवले,पूल अकाउंट, बनावट लोन
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement