पेट्रोल पंपावर मिळणारं Fule क्रेडिट कार्ड घ्यायचं की नाही? याने खरंच काही फायदा होतो? गणित समजून घ्या

Last Updated:

तुम्ही पेट्रोल पंपावर काही लोक हे फ्यूल क्रेडिट कार्ड विकताना पाहिले असतील. SBI Card, HDFC Bank, RBL Bank आणि Axis Bank सारखे मोठे बँक फ्यूल स्पेशल क्रेडिट कार्ड्स देतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर इतके वाढले आहेत की कोणतंही वाहन खरेदी करण्यापूर्वी लोक सर्वप्रथम इंधनाच्या किमतींकडे लक्ष देतात. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही मोठी समस्या ठरली आहे. रोज ऑफिसला जाणं, मुलांना शाळेत सोडणं, किंवा इतर प्रवास यात पेट्रोल भरल्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत फ्यूल क्रेडिट कार्ड्स हे खर्चात बचत करण्याचा एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
फ्यूल क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
तुम्ही पेट्रोल पंपावर काही लोक हे फ्यूल क्रेडिट कार्ड विकताना पाहिले असतील. SBI Card, HDFC Bank, RBL Bank आणि Axis Bank सारखे मोठे बँक फ्यूल स्पेशल क्रेडिट कार्ड्स देतात. यांचा वापर करुन पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी केल्यास साधारण 8.5% पर्यंत फायदा मिळतो. हा फायदा फक्त फ्यूल सरचार्ज माफ होण्यातच नाही, तर रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकमधूनही होतो.
advertisement
ही कार्ड्स विशेषत: भारतातील BPCL, Indian Oil, HPCL यांसारख्या कंपन्यांच्या भागीदारीत दिली जातात. त्यामुळे या कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर वापरल्यास जास्तीत जास्त लाभ मिळतो.
याने मिळणारे फायदे
पेट्रोल/डिझेल भरताना कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. हे पॉइंट्स पुन्हा फ्यूल घेण्यासाठी, गिफ्ट व्हाउचर्स किंवा ट्रॅव्हल खर्चासाठी वापरता येतात. यावर 1% ते 2.5% फ्यूल सरचार्ज लागत नाही. काही कार्ड्समध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स, हॉटेल डिस्काउंट्स, फूड ऑफर्स देखील मिळतात.
advertisement
योग्य कार्ड कसं निवडायचं?
फ्यूल क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी काही गोष्टींना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की, त्या कार्डवर मिळणारे ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक पाहा. कार्डची वार्षिक फी आणि व्याजदर तपासा. बँकेच्या अटी आणि वैधता समजून घ्या.
तुम्ही कोणत्या कंपनीच्या (BPCL/HPCL/Indian Oil) पंपांवर जास्त इंधन भरता, हे लक्षात घेऊन कार्ड निवडा.
advertisement
पैसा बाजारच्या अहवालानुसार, खालील कार्ड्स चांगला वॅल्यू-बॅक देतात:
BPCL SBI Card Octane
IndianOil Axis Bank Credit Card
ICICI Bank HPCL Coral Credit Card
IndianOil RBL Bank XTRA Credit Card
HPCL IDFC FIRST Power+ Credit Card
IndianOil Kotak Credit Card
ICICI HPCL Super Saver Credit Card
IndianOil HDFC Bank Credit Card
फ्यूल क्रेडिट कार्ड हे खरंच उपयोगी ठरू शकतात, विशेषत: रोज प्रवास करणाऱ्यांसाठी. मात्र, कोणते कार्ड तुमच्या गरजेनुसार योग्य आहे हे ठरवण्यापूर्वी तुमचा मासिक इंधन खर्च, तुम्ही कोणत्या पंपावर वारंवार जाता आणि कार्डची फी-ऑफर्स हे घटक नीट तपासा. योग्य निवड केली, तर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीतही तुम्ही दरमहा चांगली बचत करू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
पेट्रोल पंपावर मिळणारं Fule क्रेडिट कार्ड घ्यायचं की नाही? याने खरंच काही फायदा होतो? गणित समजून घ्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement