Income Tax : 13.7 लाखांपर्यंत पगार तरी एकही रुपया बसणार नाही टॅक्स, कसं ते समजून घ्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Income Tax Notice: टॅक्स तज्ज्ञांच्या मते, जर तुमचे वार्षिक उत्पन्न 13.7 लाख असेल, तर काही गोष्टी करून तुम्ही टॅक्स वाचवू शकता. यासाठी तुम्हाला नेशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये गुंतवणूक करावी लागेल.
मुंबई: वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेल्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा दिला. 12 लाख रुपयांपर्यंत टॅक्स फ्री केला आहे. म्हणजेच 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. मात्र, यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स द्यावा लागेल. मात्र, योग्य टॅक्स प्लॅनिंग केलं तर तुम्हाला 13.7 लाखांपर्यंत उत्पन्नावरही 'शून्य' टॅक्स भरू शकता. कसं ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
टॅक्स कसा वाचवाल?
टॅक्स तज्ज्ञांच्या मते, जर तुमचे वार्षिक उत्पन्न 13.7 लाख असेल, तर काही गोष्टी करून तुम्ही टॅक्स वाचवू शकता. यासाठी तुम्हाला नेशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये गुंतवणूक करावी लागेल. नवीन टॅक्स प्रणालीमध्ये (New Tax Regime) बेसिक सॅलरी (प्लस डीए) च्या 14% पर्यंतच्या NPS कॉन्ट्रिब्युशनवर टॅक्स डिडक्शन मिळते. हे डिडक्शन आयटी ॲक्ट सेक्शन 80CCD(2) अंतर्गत मिळतं, पण हे डिडक्शन फक्त त्या वेळी लागू होते जेव्हा कंपनी कर्मचारी NPS मध्ये गुंतवणुकीची सुविधा देतं.
advertisement
आणखी कसा वाचवता येईल टॅक्स
जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 13.7 लाख असेल आणि त्यात 50% बेसिक सॅलरी म्हणजेच 6.85 लाख असेल, तर 14% NPS योगदानानुसार 95,900 NPS मध्ये गुंतवले जाईल. याशिवाय, 75,000 स्टँडर्ड डिडक्शन जोडल्यास, एकूण डिडक्शन 1.70 लाखांपर्यंत जाईल. यामुळे तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.
advertisement
NPS म्हणजे काय?
नेशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही एक सरकारी योजना आहे जी 2004 साली सुरू करण्यात आली. 2009 पासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. ही योजना रिटायरमेंटसाठी चांगली पेन्शन देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. NPS हा मार्केटशी लिंक्ड असलेला गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामुळे दीर्घकालीन लाभ मिळू शकतात.
advertisement
NPS मध्ये गुंतवणुकीचे फायदे:
टॅक्स बचत: सेक्शन 80CCD(1B) अंतर्गत NPS मध्ये ₹50,000 पर्यंत अतिरिक्त टॅक्स बचत करता येते.
दीर्घकालीन पेन्शन: निवृत्तीनंतर नियमित पेन्शनची हमी.
मार्केट लिंक्ड रिटर्न्स: यामुळे वेळोवेळी गुंतवणुकीच्या किमतीत वाढ होऊ शकते.
कमाल डिडक्शन: NPS च्या साहाय्याने टॅक्स डिडक्शनचा जास्तीत जास्त फायदा घेता येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Income Tax : 13.7 लाखांपर्यंत पगार तरी एकही रुपया बसणार नाही टॅक्स, कसं ते समजून घ्या