आई-बाबा भाऊ मामा अख्ख्या खांदानाचं आधार कार्ड तुमच्याकडे ठेवा! कोणत्याही कटकटशिवाय, हे App कोणतं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
UIDAI ने नवीन Aadhaar App लाँच केलं असून, एकाच फोनवर पाच सदस्यांचे आधार सुरक्षितपणे ठेवता येतील. चेहरा स्कॅन, ऑफलाइन अॅक्सेस आणि सिलेक्टिव्ह शेअरिंगची सुविधा आहे.
कुणाचं आधार कार्ड आणि नंबर लागला की दहावेळा फोन आणि OTP मागायला कटकट करायला लागते. आता हे सगळंच संपणार आहे. तुमच्या अख्ख्या खानदानाचे आधार कार्ड तुमच्या फोनमध्ये फक्त एका अॅपवर राहू शकतं. अहो खरंच... केंद्र सरकारने यासाठी एक App लाँच केलं आहे. 10 नोव्हेंबर रोजी हे App लाँच करण्यात आलं.
आधार कार्ड खिशात घेऊन फिरायची गरज नाही. तुम्ही मोबाईलमध्ये कायमस्वरुपी सेव्ह करुन ठेवू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने नागरिकांसाठी अत्याधुनिक App सादर केलं आहे. हे सुरक्षित असून डिजिटल पद्धतीनं हाताळता येणार आहे.
या App मध्ये सतत आधार कार्ड तुमच्यासोबत असेल. त्यासाठी तुम्हाला पेपर कॉपीची गरज राहणार नाही. आयडीसाठी फेस स्कॅन आवश्यक आहे. OTP सारखा सुरक्षित राहील. अॅप हिंदी आणि इंग्रजीत असेल. याशिवाय इंटरनेट नसतानाही आधार पाहता येणार आहे. हॉटेल चेक इन बँक केवायसी, सिम अॅक्टिवेशन काही सेकंदात पूर्ण होईल. सिलेक्टिव्ह शेअरिंगमुळे वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील. डिजिटल इंडियाला मोहिमेला नवीन गती मिळेल.
advertisement
UIDAI म्हणजेच Unique Identification Authority of India यांनी नवीन आधार अॅप लॉन्च केला आहे. आता प्रत्येक ठिकाणी कागदाचा आधार कार्ड सोबत नेण्याची गरज नाही. हा अॅप थेट स्मार्टफोनवर चालतो आणि वापरायला अतिशय सोपा आहे. देशातील जवळपास 140 कोटी नागरिक आधार वापरतात आणि त्यांच्यासाठी हे अॅप सुरक्षित व सोईस्कर उपाय ठरणार आहे. हा अॅप पूर्णपणे मोफत आहे आणि Google Play Store तसेच Apple App Store वर उपलब्ध आहे. फोनमध्ये हा अॅप असला की कोणत्याही वेळी डिजिटल आधार दाखवता येईल.
advertisement
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, नवीन अॅपमध्ये फेशियल रिकग्निशन सुविधा आहे. म्हणजे चेहरा स्कॅन करून आधार अॅपमध्ये लॉगिन करता येईल. तसेच बायोमेट्रिक लॉक देखील लावता येतो, ज्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहते. QR कोड स्कॅन करून आधार डिटेल्स शेअर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे कोणती माहिती शेअर करायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. फक्त नाव आणि फोटो दाखवायचा की पूर्ण पत्ता आणि जन्मतारीखही शेअर करायची याचा पर्याय तुमच्याकडे असेल.
advertisement
या अॅपमध्ये एकाच फोनवर कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार जोडता येतात. मात्र सर्वांचे रजिस्टर्ड मोबाइल नंबर एकच असणे आवश्यक आहे. या अॅपची आणखी एक खास सुविधा म्हणजे ऑफलाईन अॅक्सेस. इंटरनेट नसतानाही आधी सेव केलेला आधार दाखवता येतो. अॅपमध्ये Activity Log आहे, ज्यातून आधार कधी आणि कुठे वापरला याची माहिती मिळते. त्यामुळे सुरक्षा अधिक वाढते.
advertisement
अॅप कसा डाउनलोड कराल
Google Play Store किंवा Apple App Store वर जा
"Aadhaar" अॅप शोधा आणि इंस्टॉल करा
अॅप उघडून भाषा निवडा
तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाईप करा
नोंदणीकृत मोबाइलवर आलेला OTP टाका
Face Authentication करा म्हणजे चेहरा स्कॅन करा
शेवटी 6 अंकी सुरक्षा पिन सेट करा
advertisement
नवीन अॅपमुळे कागदाचा आधार विसरण्याची समस्या संपली. आधार हरवण्याची किंवा खराब होण्याची चिंता नाही. चेहरा आणि बायोमेट्रिकमुळे सुरक्षा वाढली आहे. कुटुंबातील पाच आधार एकाच फोनवर व्यवस्थापित करता येणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/मनी/
आई-बाबा भाऊ मामा अख्ख्या खांदानाचं आधार कार्ड तुमच्याकडे ठेवा! कोणत्याही कटकटशिवाय, हे App कोणतं?


