Budget 2024: कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; सिगारेट ओढणाऱ्यांचं काय?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात कर्करोग झालेल्या रुग्णांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात त्यांनी कर्करोगाच्या तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली आहे. भारतात दरवर्षी कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता अर्थमंत्र्यांनी रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. कॅन्सरसारख्या धोकादायक आजाराशी लढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. अशा रोगांचे प्रतिबंध आणि उपचार सुधारण्यासाठी सरकार काम करत आहे. तीन औषधांवर कस्टम ड्युटीमध्ये सूट दिल्याने रुग्णांना कॅन्सरवर उपचार करणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे ह्या आजाराला कारणीभूत असलेल्या सिगारेटचे दर वाढले का?
देशात कर्करोगाने मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. यावरील औषधांचा खर्चही भरपूर होता. परिणामी अनेकांना हा खर्च पेलवत नव्हता. हाच भार कमी करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पातील घोषणेमध्ये कर्करोगाच्या औषधांवरून कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्करोगाची औषधे स्वस्त होणार असून या आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कस्टम ड्युटी हटवल्यामुळे रुग्णांना औषधांसाठी कमी किंमत मोजावी लागणार आहे. औषधांवरून कस्टम ड्युटी हटवण्याबरोबरच अनेक वैद्यकीय उपकरणांवरही सूट मिळणार आहे. याचा फायदा रुग्णांनाही होणार आहे.
advertisement
याआधीही सरकारने काही कॅन्सरची औषधे स्वस्त केली होती. गेल्या वर्षी सरकारने कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या पेम्ब्रोलिझुमॅब या औषधावरील सीमाशुल्कही हटवले होते. त्यामुळे या औषधाची किंमत कमी करण्यात आली.
कोणती तीन औषधे स्वस्त होणार?
कॅन्सर उपचारात महत्त्वाची ठरणारी 3 औषधांवरील सीमा शूल्क हटवल्याने आता ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब आणि दुर्वालुमॅब स्वस्त होईल. डेरेक्सटेकन औषध हे स्तनाच्या कर्करोगाचे औषध आहे आणि HER2 पॉझिटिव्ह जनुकांसह सर्व कर्करोगांमध्ये वापरले जाऊ शकते. Osimertinib हे EGFR फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी एक औषध आहे. Durvalumab हे फुफ्फुस आणि पित्तविषयक मार्गाच्या कर्करोगासाठी औषध आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध आहे जे PD-L1 प्रथिने अवरोधित करून कार्य करते, जे रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यास मदत करते. याचा उपयोग नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि युरोथेलियल कार्सिनोमा (मूत्राशयाचा कर्करोग) वर उपचार करण्यासाठी केला जातो.
advertisement
वाचा - मोदी 3.0 च्या पहिल्या बजेटमध्ये करदात्यांना मोठी भेट; या लोकांना टॅक्समध्ये सूट
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एक्स-रे ट्यूब आणि डिजिटल डिटेक्टरवरील कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता भारतात डिजिटल एक्स-रे मशीनच्या स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल.
सिगारेटचे दर जैसे थे..
एकीकडे कँसरच्या औषधांवर सीमा शूल्क कमी केले असले तरी सिगारेटचे दर तसेच राहणार आहेत. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.
Location :
Delhi
First Published :
July 23, 2024 2:41 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Budget 2024: कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; सिगारेट ओढणाऱ्यांचं काय?