UPI सर्कल: UPI आयडी आता फॅमिली-फ्रेंड्ससोबतही शेअर करता येणार! पाहा प्रोसेस
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
UPI Circle: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI सर्कल नावाचे एक नवीन फीचर सुरू केले आहे. जे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना त्यांचे बँक अकाउंट UPI शी लिंक न करता UPI व्यवहार करण्यास परवानगी देते. चला याविषयी डिटेल्स जाणून घेऊया.
नवी दिल्ली : तुम्ही UPI (Unified Payment Interface) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन सुविधा आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI सर्कल नावाचे एक नवीन फीचर सुरू केले आहे, जे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना त्यांचे बँक अकाउंट UPI शी लिंक न करता UPI ट्रांझेक्शन करण्यास परवानगी देते.या फीचरसह तुम्ही हे करू शकता. तुम्ही ट्रांझेक्शन लिमिटही सेट करु शकता. ज्यामुळे तुमच्या बँक अकाउंटचा सुरक्षा स्तर वाढते.
UPI सर्कल विशेषतः अशा व्यक्तींसाठी आहे. ज्यांचे स्वतःचे बँक अकाउंट नाही किंवा फक्त एक बँक अकाउंट वापरत आहेत. याद्वारे तुम्ही ज्येष्ठ नागरिक, मुले, जोडीदार किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा देऊ शकता. या अंतर्गत, एक प्रायमरी यूझर जास्तीत जास्त 5 सेकेंडरी यूझर्सना UPI ट्रांझेक्शन करण्यासाठी अधिकृत करू शकतो.
advertisement
Bank Account Rules: ...नाहीतर तुमचं बँक खातं कायमचं होईल बंद, तुम्ही पण करताय का ही चूक?
UPI सर्कल कसे वापरावे?
BHIM-UPI ॲप (किंवा इतर कोणतेही UPI ॲप) उघडा आणि "UPI सर्कल" वर क्लिक करा. त्यानंतर "Add Family or Friends" बटणावर क्लिक करा. पुढे, तुम्हाला तुमचे कुटुंब किंवा मित्र जोडण्यासाठी दोन ऑप्शन मिळतील: QR कोड स्कॅन करा किंवा त्यांचा UPI आयडी टाका.
advertisement
तुम्ही UPI आयडी ऑप्शन निवडल्यास, तुम्ही UPI आयडी एंटर केल्यावर "Add to my UPI Circle" वर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला ज्या व्यक्तीला अॅड करायचे आहे त्याचा फोन नंबर टाइप करण्यास सांगितले जाईल. लक्षात ठेवा की ती व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे.
तुम्हीही भाड्याने राहतात का? रेंट अॅग्रीमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवाच
आता तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील: "Spend with limits" किंवा "Approve every payment. पहिल्या ऑप्शनमध्ये, तुम्ही व्यवहारांसाठी लिमिट सेट करू शकता, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक व्यवहाराला मंजुरी द्यावी लागेल. तुमच्या गरजेनुसार एक पर्याय निवडा.
advertisement
तुम्ही "Spend with limits" निवडल्यास, तुम्हाला मासिक खर्च लिमिट, मंजुरी समाप्ती तारीख आणि बँक अकाउंट माहिती भरावी लागेल. यानंतर, तुमचा UPI पिन टाकून प्रोसेस पूर्ण करा. अशा प्रकारे, सेकेंडरी यूझर तुमच्या UPI सर्कलमध्ये जोडला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2024 12:15 PM IST