तुमच्या Aadhaar Card चा कोणी गैरवापर केलाय? या ट्रिकने तत्काळ होईल खुलासा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. याने आपल्या बँकिंगसह अनेक प्रकारचे पर्सनल डिटेल्स जोडलेले असतात. अशा परिस्थितीत तो चुकीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला तर त्याचा गैरवापर करू शकतो. कोणी आधार कार्डचा गैरवापर केला आहे की नाही हे तुम्ही कसे शोधू शकता. चला याविषयी जाणून घेऊया.
मुंबई : आजच्या काळात आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा डॉक्यूमेंट बनला आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा एक महत्त्वाचा डॉक्यूमेंट आहे. सिमकार्ड मिळण्यापासून ते शाळांमध्ये प्रवेश घेणे, सरकारी नोकऱ्या मिळवणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे इथपर्यंत सर्वत्र याचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेथे व्हेरिफिकेशन आवश्यक असेल किंवा आयडी प्रूफ आवश्यक असेल तेथे ते आवश्यक आहे. आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटसोबत जोडलेले आहे, त्यामुळे त्याची सुरक्षाही महत्त्वाची आहे.
आपण अनेक ठिकाणी आपले आधार कार्ड देतो. आपल्या आधार कार्डची प्रत कोण कशी वापरेल हे आपल्याला नंतर कळतही नाही. आधार कार्डमध्ये आपले पर्सनल आणि बायोग्राफिकल डिटेल्स असतात, त्यामुळे जर ते चुकीच्या हातात पडले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. मात्र, तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता.
advertisement
तुम्ही तुमचे आधार कार्ड अनेक ठिकाणी दिले असेल आणि तुम्हाला त्याचा गैरवापर होत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही याबद्दलही जाणून घेऊ शकता. ते कसे शोधू शकता तसेच आधार कार्ड कसे लॉक करू शकता याविषयी आपण जाणून घेऊया.
advertisement
अशा प्रकारे Aadhaar Cardचा गैरवापर चेक करा
तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला MyAadhaar पोर्टला भेट द्यावी लागेल. तुम्हाला वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि लॉगिन विथ ओटीपीचा ऑप्शन निवडावा लागेल. आता तुमच्या नंबरवर एक OTT सेंड केला जाईल ज्याद्वारे तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल.
advertisement
व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला ‘Authentication History’ या ऑप्शनवर जावे लागेल. आता तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर जाणून घेण्यासाठी तारीख निवडू शकता. एखाद्या तारखेला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही UIDAI कडे तक्रार करू शकता.
advertisement
आधार कार्ड ऑनलाइन लॉक करा
आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI अनेक प्रकारची सेफ्टी फीचर्स देखील प्रदान करते. तुम्ही तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डिटेल्स ऑनलाइन लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला MyAadhaar वेबसाइटवर जावे लागेल. आता तुम्हाला ‘लॉक/अनलॉक आधार’ या ऑप्शनवर जावे लागेल. आता पुढील स्टेपमध्ये तुम्हाला व्हर्च्युअल आयडी, पूर्ण नाव, पिन कोड आणि कॅप्चा भरावा लागेल. आता तुम्हाला Send OTP बटणावर क्लिक करावे लागेल.
advertisement
तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर OTP पाठवला जाईल. जो भरल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लॉक करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुमचे आधार बायोमेट्रिक्स पूर्णपणे ब्लॉक केले जातील. तुम्हाला ते अनलॉक करायचे असल्यास, तुम्हाला पुन्हा तीच प्रक्रिया फॉलो करावी लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 22, 2024 6:14 PM IST