एकाच बँकेत पूर्ण 5 लाख रुपये जमा करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या DICGCचा नियम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुमच्याजवळ 5 लाख रुपये आहेत आणइ तुम्ही त्यांना बँकेत FD किंवा इतर डिपॉझिटमध्ये टाकू इच्छित असाल तर पूर्णपैसा एकाच बँकेत ठेवणे योग्य नाही.बेस्ट पद्धत म्हणजे, रक्कम ही वेगवेगळ्या बँकेत वाटून ठेवा. याचं कारण म्हणजे DICGC चं इन्शुरन्स कव्हर आहे. प्रत्येक बँकेत प्रति ग्राहक 5 लाखांपर्यंत गॅरंटी देते. यामध्ये मूळ रक्कम आणि व्याज दोन्हीचा समावेश असतो. बँक बंद झाली किंवा त्यावर बंदी घातली गेली, तर फक्त ₹5 लाखांपर्यंतचे संरक्षण मिळते. DICGC कव्हरेजमध्ये सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD, RDसमाविष्ट आहेत.
मुंबई : ज्या लोकंकडे सेव्हिंग असते ते कुठेतरी इनव्हेस्ट करत असतात. काही लोक हे बँकेत तसेच ठेवतात. तर काही लोक एफडीचा ऑप्शन निवडतात. तुमच्याजवळ जर 5 लाख रुपये आहेत आणि तुम्ही ते बँकेत किंवा फिक्स डिपॉझिट किंवा इतर डिपॉझिटमध्ये टाकू इच्छित असाल तर पूर्ण पैसे एकाच बँकेत टाकू नका.हे पैसे वेगवेगळ्या बँकेट वाटून टाकणे ही सुरक्षित पद्धत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे DICGC म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉरपोरेशनचं इन्शुरन्स कव्हर आहे.
आरबीआयची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेली DICGC बँक ठेवींचे संरक्षण करते. बँक दिवाळखोरी किंवा स्थगिती झाल्यास, डीआयसीजीसी प्रत्येक ग्राहकांना प्रत्येक बँकेसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण रक्कम (मुद्दल + व्याज) परत करते. हे कव्हर 4 फेब्रववारी 2020 पासून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते. पहिले हे केवळ 1 लाख रुपये होते.
advertisement
तुम्ही 5 लाख रुपये एकाच बँकेत जमा केले, तर बँकेवर एखादी समस्या आल्यावर DICGC तुम्हाला फक्त 5 लाखपर्यंतच देईल. मात्र व्याजासह एकूण रक्कम 5 लाखांहून जास्त झाली तर बाकीचा पैसा बुडेल.तुमचा 5 लाखांचा एफडी मॅच्योर झाल्यावर 5.2 लाख होतो. तर बँक फेल झाल्यावर फक्त 5 लाख मिळतील. 20 हजार रुपयांचं नुकसान होईल.
advertisement
पण तुम्ही ही रक्कम दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागली, उदाहरणार्थ, एका बँकेत 2.5लाख आणि दुसऱ्या बँकेत 2.5 लाख, तर तुम्हाला प्रत्येक बँकेत 5 लाख रुपयांचे कव्हर मिळेल. याचा अर्थ तुमची संपूर्ण रक्कम, 10 लाख रुपयांपर्यंत, संरक्षित केली जाईल. हे कव्हर प्रत्येक बँकेला वेगवेगळ्या प्रकारे लागू होते, मग ती मोठी असो वा लहान, सार्वजनिक क्षेत्रातील असो, खाजगी असो किंवा स्मॉल फायनेन्स बँक असो.
advertisement
DICGC कव्हर कोणत्या अकाउंटवर मिळतो?
DICGC कव्हरमध्ये सेविंग्स अकाउंट, करंट अकाउंट, FD, RD सर्वात सामिल असतो. एकाच बँकेत जेवढे अकाउंट असतील, सर्वांचा एकूण बॅलेन्स (प्रिंसिपल + इंटरेस्ट) मिळून 5 लाखांपर्यंतच इन्शुरन्स मिळते. यामुळे तुमच्याजवळ पहिलेच पैसा असेल तर नवीन जमा करताना लक्षात ठेवा की एकूम बॅलेन्स 5 लाखांच्या वर नसावं. लहान फायनेन्स बँक किंवा काही प्रायव्हेट बँक जास्त व्याज देतात. तुम्ही तेथेही पैसे टाकू शकता. मात्र 5 लाखांच्या आत ठेवा. मोठ्या बँकेत पैसा टाकल्याने जास्त सुरक्षा मिळते असं नाही. कारण DICGC नियम हा सर्वांसाठी समान आहे.
advertisement
वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे ठेवणे का महत्त्वाचे आहे?
म्हणून, तुमच्याकडे 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम असेल, तर तुमची बचत वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागणे शहाणपणाचे आहे. यामुळे तुमचे संपूर्ण पैसे विमाकृत आहेत याची खात्री होते आणि जर एका बँकेला समस्या आल्या तर तुमचे पैसे गमावले जाणार नाहीत. शिवाय, तुम्हाला वेगवेगळ्या बँकांकडून जास्त व्याजदर मिळू शकतात. परंतु लक्षात ठेवा, DICGC फक्त ठेवींना लागू होते, शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीला नाही. बँक निवडताना, नेहमीच DICGC सदस्य बँक निवडा; बहुतेक बँका आहेत, तपासा. ही पद्धत सोपी आहे आणि तुमच्या बचतीसाठी मजबूत संरक्षण प्रदान करते. जर तुम्ही निवृत्ती, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसे वाचवत असाल, तर हे विभाजन खूप उपयुक्त ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 4:55 PM IST










