पत्नीने दिली भन्नाट कल्पना, पतीने 60 हजार रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय, जाणून घ्या, लाखोंची कमाई कशी होतेय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सुमन कुमारी यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले की, याठिकाणी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी मोहरीची लागवड करतात. पण, घरच्या वापरासाठी त्यांना बाजारातून मोहरीचे तेल घ्यावे लागत होते.
नीरज कुमार, प्रतिनिधी
बेगूसराय : पती पत्नीच्या दोघांच्या वाटचालीत दोघांचेही खूप महत्त्वाचे योगदान असते. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. पत्नीने दिलेल्या एका कल्पनेनुसार, पतीने स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यानंतर तोच व्यक्ती आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
बेगूसरायच्या अंडमान द्वीप समूह नावाने प्रसिद्ध असलेला दियारा परिसरा शाम्हो अकहा कुरहा गटातील 5 हजार एकर जागा शेतीसाठी पूरक आहे. यापैकी सुमारे तीन हजार एकर क्षेत्रात मोहरीची लागवड केली जाते. याठिकाणी मोहरीचे तेल सरसकट सर्व घरांमध्ये वापरले जाते. हे तेल अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त मोहरीच्या तेलाची खरेदी टाळण्यासाठी लोक गिरण्यांकडे वळतात.
advertisement
सैदपूरच्या रहिवासी असलेल्या सुमन कुमारी यांनी ही कल्पना त्यांचे पती राजेश यांना सांगितली. यानंतर या कल्पनेवर दोघांनी एकत्र येऊन मोहरीच्या तेलाची गाळप गिरणी सुरू केली. आता ते यातून चांगली कमाई करत आहेत.
सुमन कुमारी यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले की, याठिकाणी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी मोहरीची लागवड करतात. पण, घरच्या वापरासाठी त्यांना बाजारातून मोहरीचे तेल घ्यावे लागत होते. मात्र, बाजारात शुद्ध मोहरीचे तेल मिळेल की नाही, याबाबत सांगणे कठीण आहे. म्हणून अशा परिस्थितीत लोकांना शुद्ध मोहरीचे तेल मिळावे, यासाठी आम्ही मोहरीच्या तेलाची गाळप गिरणी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
60 हजार रुपयांपासून व्यवसायाची सुरूवात -
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, यासाठी आम्ही जीविकाकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि पतीने शेजाऱ्यांकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले. याप्रकारे 60 हजार रुपयांच्या खर्चातून आम्ही आमच्या गावात सैदपूरमध्ये मोहरीच्या तेलाची गाळप गिरणी सुरू केली. आता आम्ही दोन्ही जण दररोज 5 क्विंटल मोहरी गाळतो. यातून 150 किलो तेल तयार होते. यानंतर व्यापारी याला ठोक भावात घेऊन खुदरा येथे ग्राहकांना विकतात.
advertisement
राजेश आणि सुमन यांनी सांगितले की, एक क्विंटल सरसोंमध्ये 4800 रुपयांमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. गाळल्यानंतर आता 30 किलो तेल निघते. हे तेल 150 रुपये दराने 4500 रुपयांचे होते. याप्रकारे सर्व खर्च कपात करुन महिन्याला 50 हजार रुपयांची कमाई होते. यानुसार वर्षाला 6 लाख रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Location :
Begusarai,Bihar
First Published :
February 26, 2024 11:04 AM IST
मराठी बातम्या/मनी/
पत्नीने दिली भन्नाट कल्पना, पतीने 60 हजार रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय, जाणून घ्या, लाखोंची कमाई कशी होतेय?