Women’s Day: YES Bank ने महिलांसाठी लॉन्च केलं स्पेशल सॅलरी अकाउंट, मिळतील भरपूर फायदे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
YES Bank ने International Women’s Day पूर्वी महिलांसाठी YES Essence Women’s Salary Account लॉन्च केलं आहे. ज्यामध्ये फ्री लॉकर, 5 लाखांचं हेल्थ कव्हर आणि कॅशबॅकसारखे अनेक फायदे मिळतील.
Yes Bank Salary Account for Women: आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी खासगी क्षेत्रातील बँक YES Bank वर्किंग वुमेन्ससाठी एक खास सॅलरी अकाउंट लॉन्च केलं आहे. या नवीन अकाउंटचं नाव YES Essence Women's Salary Account आहे. बँक म्हणते की, हे अकाउंट महिलांची आर्थिक सुरक्षा, हेल्थ केयर आणि लाइफस्टाइलच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. यामध्ये एकच प्लॅटफॉर्मवर अनेक सुविधा दिल्या जात आहेत.
अकाउंटमध्ये मिळतील हे खास फायदे
- यस बँकेच्या या नवीन सॅलरी अकाउंटमध्ये महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील.
- सर्वात मोठा फायदा म्हणजे खातेधारकांना पहिल्या वर्षासाठी मोफत लॉकर अॅक्सेस मिळेल.
- महिलांना एका वर्षासाठी ₹5 लाखांपर्यंतचे मोफत टॉप-अप आरोग्य कव्हर देखील मिळेल.
- या व्यतिरिक्त अकाउंट होल्डरला वर्षात एकदा फ्री प्रिवेंटिव्ह हेल्थ चेक-अपची सुविधाही दिली जातेय.
advertisement
डेबिट कार्ड कॅशबॅक देखील उपलब्ध असेल
या खात्यासह महिलांना Elegance Debit Card देखील मिळेल. या कार्डमुळे विशिष्ट श्रेणींमध्ये खर्च केल्यावर 5% पर्यंत कॅशबॅक मिळेल. कमाल वार्षिक कॅशबॅक मर्यादा 6,000 रुपये आहे.
हे अकाउंट कोण उघडू शकते?
advertisement
YES Essence Women's Salary Account उघडण्यासाठी काही आवश्यकता आहेत.
- अर्जदार निवासी भारतीय महिला असणे आवश्यक आहे.
- तिचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- ती अकाउंटची प्रायमरी अकाउंट होल्डर असायला हवी.
याचा अर्थ असा आहे की, बँक अकाउंटची मुख्य मालक आणि अधिकृत वापरकर्ता असावी. बँक म्हणते की, हे अकाउंट महिलांना आर्थिकरुपात मजबूत बनवण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women’s Day: YES Bank ने महिलांसाठी लॉन्च केलं स्पेशल सॅलरी अकाउंट, मिळतील भरपूर फायदे










